Congress leader Salman Khurshid esakal
देश

'मुसलमान देशासाठी प्राण पणाला लावतील; पण जेव्हा त्यांच्यावर..'

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यानं खरगोन शहरातील जातीय हिंसाचारानंतर चिंता व्यक्त केलीय.

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद (Congress leader Salman Khurshid) यांनी मध्य प्रदेशमधील खरगोन शहरातील जातीय हिंसाचारावर चिंता व्यक्त केलीय. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यानं फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय, विभाजित राष्ट्र कधीही जगावर राज्य करणार नाहीय. मुस्लिम नेहमीप्रमाणंच देशासाठी आपले प्राण पणाला लावतील; पण जेव्हा त्यांच्या मुलांवर विनाकारण द्वेषानं हल्ला होतो, तेव्हा त्यांना खूप वाईट वाटतं. राज्यानं कायद्याला बगल देत मुस्लिमांची घरं उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेतलाय, हे कितपत योग्य आहे? असा सवाल खुर्शीद यांनी उपस्थित केलाय.

मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये (Madhya Pradesh Khargone Violence) झालेल्या जातीय दंगलीनंतर रामनवमीच्या (Ramanavami) मिरवणुकीवर काही समाजकंटकांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर हिंदू संघटनांसह सरकारनं काही लोकांची घरं पाडली आहेत, असा दावा खुर्शीद यांनी केलाय. मुस्लिम नागरिकांवर हल्ले करणार्‍या सरकारानं हिंदू-मुस्लिम (Hindu-Muslim) ऐक्य जपायला हवं. परंतु, हे सरकार मुस्लिमांच्या घरावर हल्ले करत आहे. हे कितपत योग्य आहे?, असा त्यांनी सवाल केलाय.

मध्य प्रदेशातील दंगलग्रस्त खरगोनमध्ये शुक्रवारी लोकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करता याव्यात, यासाठी कर्फ्यू दोन तासांसाठी शिथिल करण्यात आला होता. खरगोनच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सांगितलं की, रामनवमीच्या उत्सवादरम्यान शहरात दंगल उसळल्यानंतर रविवारी संध्याकाळी लावलेला कर्फ्यू सकाळी 10 ते शुक्रवारी दुपारी 12 वाजेपर्यंत शिथिल करण्यात आला. स्थानिक रहिवाशांना खरेदीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी फक्त दूध, भाजीपाला, वैद्यकीय साहित्य आणि रेशन दुकानं दोन तास सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. या घटनेनंतर मध्य प्रदेशातील मशिदींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याची माहिती एका मुस्लिम धर्मगुरूनं दिलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT