Supreme Court Sakal
देश

...तर अपहरणकर्त्याला जन्मठेपेची शिक्षा देता येणार नाही; सुप्रीम कोर्ट

विनायक होगाडे

नवी दिल्ली: ‘‘अपहरण करणाऱ्यांनी अपह्रत व्यक्तीला योग्य वागणूक दिली असेल तिच्यावर हल्ला केला नसेल किंवा तिला जीवे मारण्याची धमकीही दिली नसेल तर अपहरणकर्त्यांना भारतीय दंडविधान संहितेच्या ‘कलम-३६४ अ’ नुसार जन्मठेपेची शिक्षा ठोठावता येत नाही.’’ असे मत सर्वोच्च न्यायालयाने आज मांडले. न्या. अशोक भूषण आणि न्या. आर. सुभाष रेड्डी यांच्या खंडपीठासमोर आज याप्रकरणी सुनावणी पार पडली. तेलंगणमधील एका ऑटो चालकाने एका बालकाचे दोन लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केले होते, याप्रकरणी संबंधित ऑटो चालकाविरोधात खटला भरण्यात आला होता तसेच त्याला उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षाही ठोठावली होती.

एखाद्या आरोपीला ‘कलम-३६४ अ’ अन्वये दोषी ठरविताना तीन घटकांची पूर्तता करणे आवश्‍यक असते. यामध्ये संबंधित अपहरणकर्त्यांनी अपह्रत व्यक्तीला जीवे मारण्यासाठी धमकावले असल्याचे किंवा सरकार, परकी देश, सरकारी संस्था अथवा एखाद्या व्यक्तीकडून खंडणी वसूल करण्यासाठी त्या व्यक्तीला इजा पोचविली असल्याचे निष्पन्न झाले असेल तरच तिला शिक्षा ठोठावली जाऊ शकते.’’ असे न्यायालयाने म्हटले आहे.

मुलाची कबुली महत्त्वाची

तेलंगणमधील स्थानिक रहिवासी असणाऱ्या शेख अहमदने याप्रकरणी तेलंगण उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांना सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले होते. या प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. दरम्यान अपहरण झालेल्या तेरा वर्षांच्या मुलाने अहमदने आपल्याला कधीही जिवे मारण्याची धमकी दिली नव्हती, अशी कबुली पोलिसांना दिली होती. सर्वोच्च न्यायालयाने याची गांभीर्याने दखल घेताना उच्च न्यायालयाचे आदेश बाजूला ठेवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT