Aaftab Poonawala Sakal
देश

Shraddha Murder Case : मला सोडायचा हट्ट केला म्हणून मारून टाकलं; क्रूरकर्मा आफताबची कबुली

नार्को टेस्टमध्ये त्याने आपण श्रद्धाचा खून कसा केला, याची माहितीही दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणातला मुख्य आरोपी आफताब पुनावालाची नार्को टेस्ट करण्यात आली आहे. या टेस्टमध्ये त्याने श्रद्धाच्या खुनाप्रकरणी अनेक गोष्टी कबूल केल्या आहेत. तसंच आपण तिचा खून कसा केला, याची माहितीही दिली आहे.

कालच आफताबची नार्को टेस्ट पूर्ण झाली. या टेस्टमध्ये त्याने डॉक्टरांना आपल्या गुन्ह्याविषयी माहिती दिली आहे. त्याने सांगितलं की जेव्हा श्रद्धाने आपल्याला सोडून जायची धमकी दिली, त्यावेळी त्याने श्रद्धाचा खून केला. आपण श्रद्धाचं शीर लपवून ठेवलं होतं आणि नंतर ते टाकून दिलं, अशी माहितीही आफताबने दिली. मात्र ते कुठे टाकलं हे त्याला आठवलं नाही.

आफताबची नार्को टेस्ट जवळपास दोन तास चालली. या दोन तासात आफताबला दिलेल्या केमिकलमुळे तो अनेकदा बेशुद्ध पडत होता. त्याला हलवून, थोपटून जागं करावं लागत होतं. आफताबला २० - २५ प्रश्न विचारले गेले.

हेही वाचा - आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

साप्ताहिक राशिभविष्य : (१६ ऑगस्ट २०२६ ते २२ ऑगस्ट २०२६)

Taurus Weekly Horoscope: वृषभ राशीच्या नशिबाला मिळणार मोठी कलाटणी! नोकरी, पैसा आणि प्रवासात मिळणार अनपेक्षित लाभ

SCROLL FOR NEXT