kiran bedi
kiran bedi 
देश

किरण बेदी यांना पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल पदावरून हटवलं

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - पुद्दुचेरीच्या उपराज्यपाल पदावरून किरण बेदी यांना हटवण्यात आलं आहे. त्यांच्या जागी आता तेलंगनाच्या राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. किरण बेदी यांची 29 मे 2016 रोजी उपराज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती. 

बराच काळ पुद्दुचेरीचे काँग्रेस सरकार आणि किरण बेदी यांच्यात वाद सुरु होते. मुख्यमंत्री वी नारायणस्वामी यांनी 10 फेब्रुवारीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून विनंती केली होती की किरण बेदी यांना हटवण्यात यावं. त्यांच्याकडून मनमानी कारभार केला जात असल्याचा दावा त्यांनी केला होता. 

काही दिवसांपूर्वीच नायब राज्यपाल किरण बेदी यांच्याविरोधात मुख्यमंत्री नारायण सामी यांनी आंदोलन केले होते. पुद्दुचेरीचे नायब राज्यपालपद स्वीकारल्यापासून किरण बेदी आणि राज्य सरकारमध्ये सातत्याने खटके उडताना दिसतात. 

 राज्यात येत्या एप्रिल-मे महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. सर्वच पक्षांनी यासाठी तयारी सुरु केली आहे. दरम्यान, काँग्रेसचे आमदार ए जॉन कुमार यांनी मंगळवारी आणि आरोग्य मंत्री एम कृष्ण राव यांनी सोमवारी राजीनामा दिला. त्यांनी राज्यपाल किरण बेदी यांच्याविरोधात आंदोलन केलं होतं. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अडकले दिल्लीचे धुरंधर, पण कुलदीपच्या फिनिशिंग टचमुळे कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Update: दिवसभरात देशविदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT