Kissing Device Sakal
देश

Kissing Device : लाँग डिस्टन्स रिलेशनशिपसाठी आता 'किसिंग डिव्हाईस'चा शोध

लाँग डिस्टन्स पार्टनरला करताय मिस अन् करायचंय किस? चिंता नको हे डिव्हाईस तुम्हाला करणार मदत

सकाळ डिजिटल टीम

आपल्या जाडीदाराला द्यायला वेळ मिळत नसल्यामुळे अनेकजणांचे प्रेमसंबंध तुटतात. तर अनेकदा आपल्या आवडत्या व्यक्तीला भेटायची इच्छा असते पण जोडीदार जवळ नसल्यामुळे आपण फक्त फोनवर किंवा व्हिडिओ कॉलवर बोलू शकतो. दरम्यान, अनेकदा जोडीदाराचा किस घेण्याची इच्छा असतानाही आपला नाईलाज होतो.

दरम्यान, लाँग डिस्टन्स रिलेशनमध्ये असणाऱ्या व्यक्तीसाठी चिनी विद्यापीठाने एक शोध लावला असून किसिंग डिव्हाईस तयार केलं आहे. या माध्यमातून आपल्याला लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असतानाही किसिंगचा आनंद घेता येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

रिमोट किसिंग डिव्हाईसमुळे वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या प्रेमी किंवा जोडप्यांना त्यांच्या जोडीदाराचे चुंबन घेता येणार आहे. त्याचबरोबर तोंडाचे आजार असलेल्या लोकांनासुद्धा चुंबन घेता येणार आहे.

हे डिव्हाईस कसं काम करेल?

हे डिव्हाइस ब्लूटूथ आणि अॅपद्वारे फोनशी लिंक केले जाईल. हे डिव्हाईस फक्त फोनमध्ये प्लगईन करून कार्य करू शकते. दुसऱ्या डिव्हाईसला हे डिव्हाईस कनेक्ट करता येऊ शकत नाही. याला कंट्रोल करण्यासाठी रिमोट असेल. जोडीदाराने क्लिक केल्यानंतर या डिव्हाईसचे व्हायब्रेशन होईल आणि समोरच्या व्यक्तीला किसिंगचा आनंद घेता येईल असा दावा केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; ''हा निव्वळ अपघात...''

Amazon Layoffs : अमेझॉनकडून मोठा निर्णय; आणखी १६ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

IND vs NZ, 4th T20I: इशान किशन संघातून बाहेर, सूर्यकुमारने सांगितलं कारण; कोणाला मिळाली प्लेइंग-११ मध्ये संधी?

Ajit Pawar Death News LIVE Updates : अजित पवारांचं पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणाकडे रवाना

Latest Marathi News Live Update : धुरंदर नेता हरपल्याचे पुण्यात बॅनर

SCROLL FOR NEXT