Men  Goggle
देश

MP तील 'मिस्टर 26 जानेवारी' माहितीये का?; नावामागे आहे रंजक कहाणी

अनेकांनी सत्यनारायण यांना मुलाचे नाव बदलावे असे सुचविले.

निनाद कुलकर्णी

भोपाळ : नावात काय असते, असे म्हणतात. पण नावातच सर्व काही आहे, त्यामुळेच पालकही पाल्याच्या जन्मानंतर त्यांची नावे विचार करूनच ठेवतात. (Different Child Name ) मात्र, जगात अशा काही व्यक्ती आहेत ज्यांची नावे ऐकल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटते. आज आम्ही तुम्हाला अशाच एक हटके नावाच्या (Unique Boys Name) व्यक्तीबद्दल सांगणार आहोत. 26 जानेवारी (26 January ) म्हंटल्यावर आपल्यापैकी प्रत्येकाच्या डोक्यात काय येते तर सहाजिकच आहे प्रजासत्ताक दिन (Republic Day) . आज आम्ही तुम्हाला याच नावच्या व्यक्ती बद्दल सांगणार आहोत. 26 जानेवारी टेलर असे या व्यक्तीचे नाव असून तो मध्य प्रदेशातील अनेकांनी सत्यनारायण यांना मुलाचे नाव बदलावे असे सुचविले. (MP 26 January ) रहिवासी आहे. त्याच्या या नावा मागेदेखील एक मोठी रंजक गोष्ट आहे.

प्रजासत्ताक दिनी जन्म

या अद्वितीय नावाच्या व्यक्तीचा जन्म 26 जानेवारी 1966 (Birth Day On 26 Jan) रोजी झाला सध्या ते मंदसौर येथील डाएट इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत असून, त्यांचे वडील सत्यनारायण टेलर शाळेत मुख्याध्यापक (School Principal ) होते. तसेच ते देशभक्तही होते. दरम्यान, 1966 साली प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण (Flag Hosting) करत असताना त्यांना मुलगा झाल्याची माहिती मिळाली आणि सत्यनारायण यांनी देशभक्तीने प्रभावित होऊन मुलाला 26 जानेवारी असे नाव दिले.

वडिलांनी नाव बदलण्यास दिला नकार

दरम्यान, 26 जानेवारी जेव्हा मोठे होण्यास सुरुवात झाली त्यावेळी त्यांना त्यांच्या या वेगळ्या नावामुळे अनेक समस्यांना (Problem Due To Different Name) तोंड द्यावे लागले. त्यामुळे अनेकांनी सत्यनारायण यांना मुलाचे नाव बदलावे असे सुचविले. मात्र, सत्यनारायण त्यांच्या निश्चयाशी ठाम होते. पाचवीच्या वर्गात पोहोचल्यावर शाळेतील शिक्षकांनीही आता मुलाचे नाव बदला असे समजावून सांगितले, मात्र वडिलांनी (Father) नाव बदलण्यास नकार दिला.

नोकरीतही आल्या अनेक अडचणी

26 जानेवारी टेलरल यांनाही त्यांच्या हटके नावामुळे नोकरीत (Job) देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागला. एकदा जिल्ह्याचे डीएम त्यांचे नाव ऐकून आश्चर्यचकित झाले. अशा स्थितीत टेलरकडे नावाचा पुरावा मागताना त्यांनी पगार थांबवला. त्यानंतर टेलर यांनी डायटच्या प्रिन्सिपलची भेट घेत सर्व प्रकार सांगितला. तेव्हा मुख्याध्यापकांनी डीएमसमोर नाव योग्य असल्याचा पुरावा दिला. त्यानंतर 26 जानेवारी टेलर यांना पगार (Salary) देण्यात आला.

आता नावाचा अभिमान

सुरुवातीला लोक 26 जानेवारी (26 January) नावाची खिल्ली उडवत असत, पण हळूहळू सगळ्यांना त्याच्या वागण्यावर विश्वास बसू लागला. आज प्रत्येकाला त्यांच्या नावाचा अभिमान (Proud) आहे. त्यांचे नाव राष्ट्रीय सणावर आहे यापेक्षा देशभक्ती काय असू शकते, असे लोक म्हणतात. या प्रजासत्ताक दिनी (Republic Day ) टेलर 56 वा वाढदिवस साजरा करत आहे. या दिवशी प्रथम कर्मचाऱ्यांकडून तिरंगा फडकवला जातो. त्यानंतर राष्ट्रगी इत्यादी कार्यक्रमानंतर टेलर यांचा वाढदिवस (Birthday Celebration ) साजरा केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Ramesh Thorat : माजी आमदार रमेश थोरात घड्याळ हाती बांधण्याच्या तयारीत; अशोक पवार मात्र पक्षातच समाधानी

Latest Marathi News Updates: माझ्या स्तरावर मी गंभीर दखल घेतली आहे - राहुल नार्वेकर

MLA Rahul Kul : उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बुडीत बंधारे उभारावेत; आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Mahadev Munde Case: खळबळजनक! '‘महादेव मुंडे खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला वाल्मीकने संपवलं’', आकस्मिक मृत्यूचा बनाव

Eleventh Admission : अकरावीच्या दुसऱ्या फेरीत राज्यातील दोन लाख ५१ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश

SCROLL FOR NEXT