Vikas Dubey encounter, UP gangster, Vikas Dubey killed  
देश

Vikas Dubey Encounter: अटकेपासून ते एन्काउंटरपर्यंत नेमकं काय घडलं

सकाळ डिजिटल टीम

Vikas Dubey Encounter: उत्तर प्रदेश पोलिस पथकातील अधिकाऱ्यासह 8 पोलिस कर्मचाऱ्यांच्या हत्याकांडातील प्रमुख सूत्रधार विकास दुबे याचा फिल्मी स्टाइल खात्मा झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश स्पेशल स्टास्क फोर्स (एसटीएफ) च्या वाहनातून विकास दुबेला मध्य प्रदेशमधून कानपुरच्या दिशेने नेत असताना वेगाने असणारी गाडी (ज्यात विकास दुबेला बसवण्यात आले होते) अचानक पलटी झाली. या अपघातामध्ये विकास दुबेसह वाहनातील काही जवानही जखमी झाले. या अपघातातून सावरत असतानाच मोक्याचा फायदा उठवत विकास दुबेने एसटीएफच्या एका अधिकाऱ्याची पिस्तूल हिसकावून घेतली. त्यानंतर जवान आणि विकास दुबे यांच्यात चकमक झाली. एसटीएफने विकासला पिस्तूल खाली ठेवत सरेंड होण्याची सूचना दिली. मात्र विकास दुबेने याला प्रतिसाद न दिल्याने पोलिसांना त्याचा एन्काउंटर करावा लागला.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकासने पिस्तूल हिसकावून घेतल्यानंतर चकमक झाली. प्रत्त्युतरादाखल केलेल्या गोळीबारात त्याचा खात्मा झाला. विकास दुबेला जखमी अवस्थेत कानपूरमधील हॅलट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात डॉक्टरांनी विकास दुबेला मृत घोषीत केले. विकास दुबेसोबत झालेल्या चकमकीत एक पोलिस कर्मचारी जखमी झाल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.  

Video : 'होय मीच विकास दुबे, कानपूर वाला'; काय घडलं उज्जैनच्या मंदिरात?

उज्जैनच्या महाकाल मंदिरातून केली होती अटक

कानपूरच्या बिकरु गावात पोलिस पथकावर गोळीबार केल्यानंतर विकास दुबे पसार झाला होता. मध्यप्रदेशच्या उज्जैन येथील महाकाल मंदिरातून त्याला अटक करण्यात आले. त्याच्या अटकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थिती करण्यात आले होते. विकास दुबे 250 रुपयांची पावती करुन दर्शनासाठी या मंदिरात आला होता. एका सुरक्षा रक्षकाने त्याची माहिती पोलिसांना दिली. अटकेपूर्वी विकास दुबे स्वत:चे फोटो काढत होता, अशी माहितीही समोर आली होती. एवढेच नाही तर अटकेनंतर  'मैं विकास दुबे हूं, कानपुर वाला।' असा आरडा ओरडाही त्याने केला होता. 

उत्तर प्रदेश- दिल्ली अन् मध्य प्रदेश...


कानपूर घटनेनंतर जवळपास 150 तास तो पोलिसांना चकवा देत राहिला. उत्तर प्रदेशमधून पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला होता. पोलिसांपासून वाचण्यासाठी तो दिल्लीमध्ये पोहचला. त्यानंतर तो फरिदाबादमध्येही फिरत असल्याचे समोर आले होते. याठिकाणी एका सीसीटीव्ही फुटेजही समोर आले होते. यावेळी तो पोलिसांना गुंगारा देऊन पसार होण्यात यशस्वी झाला होता. पोलिस त्याला पकडण्यासाठी जाळे पसरवत असताना विकास दुबे स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन करणार असल्याची चर्चाही प्रसारमाध्यमांवर रंगली. मात्र या चर्चेदरम्यान तो मध्य प्रदेशमध्ये पोहचला होता. अखेर त्याला तेथून अटक करण्यात पोलिसांना यश आले.   
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT