Madhulika Rawat  Awwaindia
देश

मधुलिका रावत : राजकन्या ते शहीद जवानांच्या कुटुंबियांचा आधारवड

मधुलिका रावत यांनी दिल्ली विद्यापीठातून मानसशास्त्रात पदवी घेतली आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : सीडीएस बिपीन रावत (CDS Bipin Rawat) यांच्या हेलिकॉप्टरला बुधवारी कुन्नुर (Bipin Rawat Helicopter Crash ) येथे अपघात झाला. यामध्ये रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला आहे. (All you need to know about Madhulika Rawat)

कोण आहेत बिपीन रावत यांच्या पत्नी

बिपिन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत (Madhlika Rawat) कुटुंबाला सांभाळण्यासोबतच आर्मी वाइव्हज वेलफेअर असोसिएशनच्या अध्यक्षा होत्या. (President of Army Wives Welfare Association) आर्मी वाइव्हज वेल्फेअर असोसिएशन (Awwa ) ही लष्करातील कर्मचाऱ्यांच्या पत्नी, मुले आणि आश्रितांच्या कल्याणासाठी काम करणारी नोडल संस्था आहे. युद्धात प्राण गमावलेल्या शहीदांच्या पत्नी आणि आश्रितांच्या कल्याणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याच्या उद्देशाने 1966 मध्ये याची स्थापना करण्यात आली आहे.

मधुलिका रावत यांचे शिक्षण

मधुलिका रावत यांनी दिल्लीतून शिक्षण पूर्ण केले होते आहे. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून मानसशास्त्रात पदवी घेतली होती. AWWA व्यतिरिक्त, मधुलिका यांचा अनेक प्रकारच्या सामाजिक कार्यातदेखील सहभाग होता. विशेषत: त्या कर्करोगग्रस्तांसाठी, अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य करत होत्या. अव्वा अंतर्गत मधुलिका रावत या शहिदांच्या पत्नींच्या विकासासाठी आणि राहणीमानासाठी विविध कार्यक्रम राबवत होत्या.

महिला दिनाविमित्त आर्मी जल अभियान

यावर्षी 8 मार्च रोजी महिला दिनानिमित्त मधुलिका रावत यांच्या नेतृत्वाखाली ‘आवा’तर्फे आर्मी जल अभियान सुरू करण्यात आले होते. बाटलीबंद पाण्याच्या परदेशी कंपन्यांऐवजी देशातील जनतेने लष्कराचे पाणी विकत घ्यावे, जेणेकरून त्यातून जमा होणारा पैसा शहीदांच्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरता येईल, हा त्यामागील उद्देश होता. इतकेच नाही तर मधुलिका रावत या शहिदांच्या आश्रितांच्या विकासासाठी अनेक कार्यक्रम आणि मोहिमांशी जोडल्या गेल्या होत्या.

मधुलिका रावत यांचे राजघराण्याशी कनेक्शन

मधुलिका रावत यांचे लग्नापूर्वीचे नाव मधुलिका सिंह होते. स्व. कुंवर मृगेंद्र सिंह यांच्या त्या कन्या. मृगेंद्र सिंह हे रीवा घराण्याशी संबंधित आहेत. मृगेंद्र सिंह हे शहडोलच्या सोहागपूर येथून दोन वेळा काँग्रेसचे आमदार होते. मधुलिका सिंह यांचे १२ वीपर्यंतचे शिक्षण मध्य प्रदेशमध्ये झाले होते. यानंतर त्यांनी दिल्लीतून मानसशास्त्र विषयात पदवी घेतली. १९८५ मध्ये त्यांचे बिपीन रावत यांच्याशी लग्न झाले. रावत दाम्पत्याला दोन मुली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

Latest Maharashtra News Updates : ..मग महाराष्ट्रात भाषे वरून भांडणे का लावली जात आहेत? - संजय राऊतांचा सवाल!

Farmer Situation : औसा तालुक्यातील शिवणी (बु.) येथील वृद्ध शेतकरी दांपत्य ओढताहेत हाताने कोळपे

टीआरपीमध्ये अचानक वर आली 'ही' मालिका; 'या' मालिकांना टाकलं मागे; अभिनेत्याने केली खास पोस्ट

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

SCROLL FOR NEXT