सध्या जगभरात कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron) च्या पार्श्वभूमीवर काळजी घेतली जात आहे. देशभरातील आंतरराष्ट्रीय विमानतळांवर केंद्राच्या कोरोना संबंधित सुधारित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात येत आहे. कोरोनाचा धोका असलेल्या देशांतील प्रवासी भारतात दाखल होताच त्यांना RT-PCR टेस्ट करणे अनिवार्य करण्यात आले आहे, तसेच त्यांचे लसीकरण पुर्ण झालेले असणे देखील आवश्यक आहे.
हे नियम लागू करण्यात आलेले असल्याने RT-PCR टेस्टचे दर, लांबलचक रांगा आणि गर्दीमुळे होणारा उशीर हा आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मोठा चिंतेचा विषय बनला आहे. देशातील काही विमानतळांवर तर रॅपिड टेस्टसाठी तब्बल 3,000 रुपयांपेक्षा जास्त फी आकारली जात आहे. दरम्यान आज आपण देशातील विमानतळांवर रॅपिड RT-PCR टेस्टचे दर काय आहेत ते पाहाणार आहोत.
मुंबई
अदानी ग्रुपकडून चालवल्या जाणार्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॅपिड RT-PCR टेस्टचा दर पूर्वीच्या 4,500 रुपयांवरून 3,900 रुपये प्रति टेस्ट कमी करण्यात आला आहे. सामान्य आरटी-पीसीआर चाचणीसाठी प्रवाशांना 600 रुपये द्यावे लागतात, असे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या निवेदनात म्हटले आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहून येथील रॅपिड आरटी-पीसीआर टेस्टचे दर खूप जास्त असल्याचे सांगीतले होते.
दिल्ली
विमानतळ अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर टेस्टसाठी दोन पर्याय दिले आहेत: पहिला म्हणजे चाचणीसाठी 500 रुपये द्यावे लागतील मात्र त्यानंतर त्या टेस्टच्या रिपोर्टसाठी सुमारे सहा ते आठ तास लागतात. दुसरे पर्याय म्हणजे रॅपिड पीसीआर टेस्ट ज्यासाठी 3,500 रुपये द्यावे लागतील आणि अंदाजे 60 ते 90 मिनिटांत रिपोर्ट मिळतो.
चेन्नई
चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळाने मंगळवारी RT-PCR दर कमी केले आहेत. आता रॅपिड पीसीआर चाचणीसाठी 2,900 रुपये आकारले जात आहेत , जे पूर्वी 3,400 रुपय होते. सामान्य RT-PCR चा दर देखील 700 रुपयांवरून 600 रुपयांपर्यंत कमी करण्यात आला आहे .
कोलकाता
कोलकाता आंतरराष्ट्रीय विमानतळ सामान्य RT-PCR चाचणीसाठी 700 रुपये आणि रॅपिड RT-PCR टेस्टसाठी 3,600 रुपये आकारले जातात . दोन्ही टेस्टचे रिपोर्ट मिळण्यासाठी लागणारा वेळ हा अनुक्रमे सहा तास आणि एक तास इतका आहे.
बेंगळुरू
कर्नाटक सरकारने मंगळवारी विमानतळांवर कोविड चाचणीसाठी किंमती निर्धारीत केल्या आहेत. बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर, सामान्य RT-PCR चाचणी, ज्याला सर्वाधिक वेळ लागतो (रिपोर्ट मिळण्यासाठी जवळपास पाच तास) त्याची किंमत 500 रुपये केली आहे, तर Cepheid Gene Expert टेस्ट (25 मिनिटांत रिपोर्ट मिळतो) त्यासाठी 2,750 रुपये द्यावे लागतात.
अहमदाबाद
सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या वेबसाइटनुसार, रॅपिड RT-PCR टेस्टसाठी प्रवाशाला 2,700 रुपये मोजावे लागतील.
कोझिकोडे
कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळाने मंगळवारी जाहीर केले की त्यांनी रॅपिड पीसीआर चाचणीचे दर 1,580 रुपयांपर्यंत कमी केले आहेत .
हैदराबाद
जीएमआर हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर आरटी-पीसीआर टेस्टसाठीची किंमत 750 रुपये आहे आणि रॅपिड पीसीआर टेस्टची किंमत 3,900 रुपये आहे .
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.