Siliguri Crime News esakal
देश

Crime News : विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पत्नीची हत्या; मृतदेहाचे तुकडे करून कालव्यात दिले फेकून

मोहम्मद अन्सारुलनं विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पत्नीची हत्या केलीये.

सकाळ डिजिटल टीम

पती मोहम्मद अन्सारुलनं विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पत्नीची हत्या केलीये. यानंतर त्यानं रेणुका यांच्या मृतदेहाचे दोन तुकडे करून तीस्ता कालव्यात फेकून दिले.

सिलीगुडीतून एक धक्कादायक घटना समोर आलीये. इथं पतीवर पत्नीची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याचा आरोप आहे. ही घटना सिलीगुडीतील (Siliguri) फणसीदेवाच्या गोवलतुली भागातील आहे. रेणुका खातून असं मृत व्यक्तीचं नाव आहे.

मिळालेली अधिक माहिती अशी, पती मोहम्मद अन्सारुलनं विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पत्नीची हत्या केलीये. यानंतर त्यानं रेणुका यांच्या मृतदेहाचे दोन तुकडे करून तीस्ता कालव्यात फेकून दिले. पोलिसांचं पथक गुरुवारी सकाळपासून रेणुका यांच्या मृतदेहाचा तीस्ता कालव्यात शोध घेत आहे.

आठवड्यापासून रेणुका होती बेपत्ता

पोलिसांनी (Siliguri Police) दिलेल्या माहितीनुसार, रेणुका ही सिलीगुडी परिसरातील कॉलेजच्या ब्युटी पार्लरमध्ये काम शिकण्यासाठी गेली होती. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ती बेपत्ता होती. रेणुकाच्या कुटुंबीयांनी 24 डिसेंबरला सिलीगुडी पोलिस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.

Siliguri Crime News

पत्नीला भोसकून मृतदेहाचे केले तुकडे

दरम्यान, अन्सारुलच्या चौकशीत खळबळजनक माहिती समोर आलीये. अन्सारुलनं 24 डिसेंबरला पत्नीची हत्या केल्याचं तपास अधिकाऱ्यांना समजले. यानंतर त्यानं मृतदेहाचे दोन तुकडे केले आणि छठला लागून असलेल्या तीस्ता कालव्यात फेकले. रेणुकाचा विवाह अन्सारुलशी 6 वर्षांपूर्वी झाला होता. तो दादाभाई कॉलनी, वॉर्ड क्रमांक 43, सिलीगुडी इथं राहत होता. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या पतीला गुरुवारी सिलीगुडी न्यायालयात हजर करण्यात आलं. पोलिसांनी पतीकडं चौकशी केली असून या प्रकरणाची संपूर्ण माहिती गोळा करण्यात व्यस्त आहेत.

'आम्हाला सुरुवातीपासूनच अन्सारुलवर होता संशय'

पोलिसांनी सांगितलं की, आम्हाला सुरुवातीपासूनच अन्सारुलवर संशय होता. त्यानं परस्परविरोधी आणि दिशाभूल करणारी विधानं केली. अन्सारुलनं पोलिसांना सांगितलं की, 'मी रेणुकाला माझ्या मोटारसायकलवरून सुमारे 10 किमी अंतरावर असलेल्या फणसीदेवा इथं घेऊन गेलो. तिथं एका कालव्याजवळ पोहोचल्यावर, मी माझ्या पत्नीला भोसकून ठार केलं आणि तिच्या शरीराचे दोन तुकडे केले.' अधिकारी म्हणाले, "अन्सारुलनं डोके आणि धड दोन गोण्यांमध्ये टाकलं आणि कालव्याच्या पाण्यात फेकून दिले. गुरुवारी सकाळपासून सिलीगुडी पोलीस राज्य आपत्ती निवारण दलाच्या (SDRF) सहाय्यानं शरीराच्या अवयवांचा शोध घेत आहे. परंतु, अद्याप त्यांना फारसं यश मिळालं नाही, असं सिलीगुडीचे अतिरिक्त डीसीपी शुभेंद्र कुमार यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: कामासाठी इमारतीमध्ये गेले; पण कुत्रा मागे लागला अन्...; सारंच संपलं! पुण्यात 'त्या' इलेक्ट्रिशियनसोबत काय घडलं?

Ahilyanagar : एबी फॉर्म मिळवून अर्ज भरला, पक्षानं काढून टाकलं, चोरीचा ठपका ठेवत शिस्तभंगाची कारवाई

Stock Market Today : आज भारतीय शेअर बाजार विक्रमी पातळीच्या जवळ बंद; सेन्सेक्स तब्बल 446 अंकांनी वाढला; हे शेअर्स फायद्यात!

Latest Marathi News Update LIVE : अनिल देशमुखांच्या मुलाचा शरद पवार गटाला रामराम

Pune Municipal Election : पुण्यात ३५ लाख ५१ हजार मतदार! १० प्रभागातील मतदार संख्या लाखाच्या पुढे, प्रचारात उमेदवारांची होणार दमछाक

SCROLL FOR NEXT