Crowd chaos during the Messi-related event in Kolkata that led to the resignation of West Bengal Sports Minister Arup Biswas.
esakal
West Bengal Sports Minister Arup Biswas resigns after chaos at the Kolkata Messi event : अर्जेंटिनाचा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीने नुकताच भारत दौऱ्यावर येवून गेला. या दौऱ्यात सर्वप्रथम तो पश्चिम बंगालमध्ये पोहचला होता. मात्र यावेळी झालेल्या प्रचंड गोंधळामुळे पश्चिम बंगालचं राजकारण प्रचंड तापले आहे. त्यानंतर आता राज्याचे क्रीडामंत्री अरुप बिस्वास यांना देखील राजीनामा द्यावा लागला आहे. त्यांनी या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र पाठवून राजीनामा दिला आहे.
दरम्यान, तृणमूल काँग्रेस प्रवक्ता कुणाल घोष यांनी माहिती दिली आहे की, अरुप बिस्वास यांचा राजीनामा स्वीकरल्या गेला आहे. युवा भारती घोटाळ्याबाबत सुरू असलेल्या वादावरून अरूप बिस्वास यांना क्रीडा विभाग सोडण्यास सांगण्यात आले होते.
एवढच नाहीतर मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ प्रकरणात राज्याच्या मुख्य सचिवांनी पोलिस महासंचालक राजीव कुमार आणि विधाननगरचे पोलिस आयुक्त मुकेश कुमार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शिवाय, विधाननगरचे पोलिस उपायुक्तांना निलंबितही करण्यात आले आहे.
याचबरोबर कार्यक्रमाच्या दिवशी कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांमध्ये निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल डीसीपी अनिश सरकार यांच्याविरुद्ध विभागीय कारवाई सुरू करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.
याव्यतिरिक्त, युवा व्यवहार आणि क्रीडा विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार सिन्हा यांनाही कार्यक्रमाच्या दिवशी झालेल्या गैरव्यवस्थापन आणि त्रुटींचे स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.