kolkata mumbai affected cyber attacks report of Quick Heal sophisticated methods for fraud Sakal
देश

Cyber Crime : कोलकता, मुंबईला सायबर हल्ल्याचा सर्वाधिक फटका

‘क्विक हील’ चा अहवाल; सायबर गुन्ह्यांत वाढ, फसवणुकीसाठी अत्‍याधुनिक पद्धतींचा वापर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई, पुण्यासह कोलकाता आणि दिल्ली या भारतातील प्रमुख शहरांमध्ये सायबर हल्ल्यांत वाढ झाल्‍याचे क्विक हीलच्‍या सेक्‍यूराइट लॅब्‍सच्‍या अहवालामधून निदर्शनास आले आहे. २०२३ च्‍या दुसऱ्या तिमाहीमध्‍ये देशातील आघाडीच्या १० शहरांत या हल्ल्याचा सर्वाधिक फटका पश्‍चिम बंगालची राजधानी कोलकता शहराला बसला असून ७.०८ दशलक्ष सायबरहल्ल्यांसह हे शहर यादीमध्‍ये अव्‍वलस्‍थानी आहे.

त्यानंतर ७.०० दशलक्ष सायबर हल्ले नोंदविणाऱ्या मुंबईचा क्रमांक लागतो सायबरसिक्‍युरिटी क्षेत्र झपाट्याने विकसित होत आहे, त्‍याचप्रमाणे सायबरगुन्‍हेगार देखील गुन्‍हे करण्‍याच्‍या अत्‍याधुनिक पद्धतींचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत.

२०२३ च्‍या दुसऱ्या ति‍माहीत सेक्‍यूराइट लॅब्‍स संशोधकांना या सायबरगुन्‍हेगारांनी विविध माध्यमांवर व अॅप्‍लीकेशन्‍सवर वापरलेल्‍या नावीन्यपूर्ण तंत्रात मोठी वाढ दिसून आली. निदर्शनास आलेले सर्वात मोठे ट्रेंड म्‍हणजे हिडन अॅड्स, ज्‍यांचा गुगल प्‍लेवरील अँड्रॉईड गेमिंग अॅप्‍सच्‍या माध्‍यमातून प्रसार होत आहे.

ओळख समजू नये म्‍हणून हुशारीने आयकॉन्‍सचा समावेश करण्‍यात आलेल्‍या या जाहिराती अॅप्‍समध्‍ये प्रवेश करतात आणि अज्ञात डोमेन्‍समधून फसव्या जाहिराती दाखवत वापरर्कत्यांची दिशाभूल करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

क्विक हीलचा इशारा

क्विक हील टेक्‍नॉलॉजिज् लि.ने वापरकर्त्यांना कायदेशीर वाटणाऱ्या अशा बनावट अॅप्सपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. हे फसवे अॅप्लिकेशन फेसबुक किंवा गुगल क्रेडेन्शियल्स, जीपीएस लोकेशन्स ट्रॅक करणे, व्हिडिओ रेकॉर्ड करणे आणि हिडन सर्व्हरवर डेटा ट्रान्समिट करणे यासारखी संवेदनशील माहिती चोरू शकतात.

सर्वेक्षणाचा कालावधी

एप्रिल ते जून २०२३ या कालावधीसाठी भारतातील सायबर हल्ल्यांबाबत क्विक हीलच्‍या सर्वसमावेशक अहवालामधून निदर्शनास आले की, लॅपटॉप व पीसींवर प्रत्‍येक दिवशी शोधण्‍यात आलेल्‍या एक दशलक्षहून अधिक सायबर हल्ल्यांचे व्‍यापक संशोधन व विश्‍लेषणामधून काही झालेल्या नुकसानीचे आकलन झाले आहे. तसेच अहवालामधून निदर्शनास आले की, देशभरातील सेक्‍यूराइट लॅब्‍स तज्ञांनी १०२.८ दशलक्षहून अधिक सायबर हल्ले शोधून काढण्यात यश मिळवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT