Meenadevi Purohit
Meenadevi Purohit esakal
देश

भाजपाच्या मीनादेवींनी रोखली तृणमूलची लाट

सकाळ डिजिटल टीम

कोलकाता महानगरपालिकेच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसनं निर्विवाद वर्चस्व राखलंय.

कोलकाता : पश्चिम बंगालच्या (West Bengal) प्रभाग क्रमांक 140 मध्ये टीएमसीचे उमेदवार अबू मोहम्मद ताहिक 7500 मतांनी पहिल्या फेरीतच विजयी झाले आहेत. तर, कोलकाता महानगरपालिका निवडणुकीत (Kolkata Municipal Election) ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसनं (Trinamool Congress) क्लीन स्विप करत मोठा विजय मिळवलाय. तृणमूलच्या या लाटेत भाजपा (BJP), काँग्रेस (Congress), डावे सर्वच पक्ष पालापाचोळ्यासारखे उडून गेले. मात्र, या लाटेत भाजपाच्या एका महिला नेत्यानं भक्कमपणे पाय रोवत विजयाचा षटकार ठोकलाय. मीनादेवी पुरोहित (Meenadevi Purohit) असं या भाजपाच्या महिला नेत्याचं नाव आहे.

कोलकाता महानगरपालिका निवडणुकीत तृणमूलच्या उमेदवारांनी सकाळपासूनच प्रत्येक प्रभागात आघाडी घेतली होती. मात्र, या सगळ्यांवर भाजपाची एक महिला नेत्या भारी पडलीय. कोलकातामधील वॉर्ड क्रमांक 22 मधून जिंकणाऱ्या मीनादेवी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं, की मी सहाव्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्याने खूप खूश आहे. माझा विजय हा जनता आणि भाजपा कार्यकर्त्यांचा आहे. येथील मतदान प्रक्रिया निष्पक्ष नव्हती, जर ही प्रक्रिया निष्पक्ष असती तर भाजपा अधिक जागांवर जिंकली असती, असा ठाम आरोप त्यांनी केलाय. बारावी पास असलेल्या मीनादेवी पुरोहित यांनी जोडासांको विधानसभा मतदारसंघामधूनही विजय मिळवला होता. तर, 50 नंबर वॉर्डमधून विजयी झालेले सजल घोष (Sajal Ghosh) यांचे वडीलही आधी नगरसेवक राहिले आहेत.

भाजपा, डावी आघाडी आणि काँग्रेस राज्यात उरले नाहीत : ममता बॅनर्जी

कोलकाता महानगरपालिका निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. या निकालांमध्ये तृणमूल काँग्रेसनं मोठी आघाडी घेतल्याचे चित्र आहे. तर निकालांवर प्रतिक्रिया देत पक्षाच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी 'मोठा विजय' म्हटलंय. तसेच सत्ताधारी पक्षावर विश्वास ठेवल्याबद्दल कोलकात्यातील जनतेचे आभार मानले. तसेच या निवडणुकांमध्ये भाजपा, डावी आघाडी आणि काँग्रेस कोठेही उरले नाहीत, असं त्या म्हणाल्या. ही निवडणूक लोकशाहीचा विजय आहे, जनतेने आमचे काम स्वीकारले आहे, असा स्पष्ट संदेश या निवडणुकीने दिला आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT