देश

High Temperature : कोलकातामध्ये पन्नास वर्षातल्या सर्वोच्च तापमानाची नोंद; हवामान खात्याने दिली माहिती

संतोष कानडे

नवी दिल्लीः सध्या देशातल्या सर्वच भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर उष्णतेचा उच्चांक पहावयास मिळत आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये उष्णतेने मागच्या पन्नास वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे. अलीपूर वेधशाळेने तापमानाची नोंद घेतली आहे.

मंगळवारी कोलकाता येथे ४३ अंश सेल्सिअस तापमान होते. अलीपूर वेधशाळेने मागच्या ५० वर्षांतील सर्वोच्च तापमान नोंदवले असून हवामान खात्याने याबाबत माहिती दिली आहे. रविवारपासून तापमानात घट होईल, अशी माहिती देत पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.

कोलकाला येथील सॉल्टलेक परिसरामध्ये ४३.५ सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. तर उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बराकपूरमध्ये ४४.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. यासह पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील कलाईकुंडा येथे राज्यातील सर्वाधिक तापमान ४७.२ डिग्री सेल्सियस नोंदवले गेले.

पश्चिम वर्धमान जिल्ह्यातील पनागढ येथे ४५.६ डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवले असून मेदिनीपूर शहर 45.5 डिग्री सेल्सिअसच्या खाली होते. तर बांकुरा येथे 45.1 डिग्री सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे.

बंगळूरुमध्ये कसं आहे हवामान?

कोलकातापाठोपाठ बंगळूरु येथेही तापमानाने उच्चांक गाठला आहे. येथेही तापमानाने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. रविवारी, बंगळुरूमध्ये ३८.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. एवढे तापसमान मागच्या पन्नास वर्षांत केवळ दुसऱ्यांदा नोंदवले गेलेले आहे.

भारतीय हवामान खात्याने (IMD) अनेक राज्यांमध्ये तापमान वाढण्याचा इशारा दिला आहे. यामध्ये आंध्र प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये रेड अलर्ट जारी केलाय. उच्च तापमान 2 मे पर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचं आवाहनही विभागाने केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT