Coronavirus Mock Drills esakal
देश

Covid Death: चोवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू क्षयरोगामुळं की कोविडनं? डॉक्टरांच्या घोषणेमुळं संभ्रम

रुग्णालय प्रशासनानं त्याचा मृत्यू कोविडनं झाल्याचं जाहीर केल्यानं संभ्रम निर्माण झाला आहे. | 24-year-old died of tuberculosis or covid? Confusion due to doctor's announcement

Amit Ujagare (अमित उजागरे)

कोलकाता इथल्या रहिवासी असलेल्या एका २४ वर्षीय तरुणाची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पण हा तरुण आधीच क्षयरोगानं ग्रस्त होता, त्याला क्षयरोगाच्या आजारांपैकी ट्युबरक्युलोसिस मेनिंगिटीस (TBM) हा आजार होता. रविवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. पण रुग्णालय प्रशासनानं त्याचा मृत्यू कोविडनं झाल्याचं जाहीर केल्यानं संभ्रम निर्माण झाला आहे. (kolkata youth died due to tuberculosis or covid confusion due to doctor announcement)

अशिष हलदर (वय २४) याला गेल्या मंगळवारी कलकत्ता मेडिकल कॉलेजमध्ये अॅडमिट करण्यात आलं होतं. त्याला TBM चा संसर्ग झाल्याचं निदान झालं होतं. त्याच्यावर राज्य सरकारच्या रुग्णालयात उपचार सुरु होते. पण त्याच्यामध्ये कोविडची लक्षण देखील दिसू लागली होती. त्यामुळं शनिवारी झालेल्या तपासणीत तो कोविड पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर रविवारी त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं. (Latest Marathi News)

रुग्णालय प्रशासनानं या मृत्यूबाबत सांगितलं की, रुग्ण हा आधीच गंभीर स्थितीत होता. त्याच्यावर आयसीयूमध्ये सर्वप्रकारचे उपचार सुरु होते. त्याच्या मृत्यू प्रमाणपत्रावर मृत्यूचं तातडीचं कारण हे क्षयरोग असं म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

पण त्याला कोविडचा न्युमोनिया देखील झाला होता. टीबीएम आणि टीबी असे दोन्ही आजार एकाच वेळी झाल्यानं त्याची स्थिती गंभीर बनली होती. त्यामुळं त्याला कोविडनं मृत्यू झाल्याच्या यादीत टाकलं आहे. यामुळं कोविडमुळं मृत्यू झालेल्यांच्या आकडेवारीबाबत संभ्रम निर्माण होतो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gotya Gitte: वाल्मिक कराड माझे दैवत, धनंजय मुंडेंना बदनाम करु नका, नाहीतर... फरार गोट्या गित्तेची जितेंद्र आव्हाडांना धमकी, व्हिडिओ व्हायरल

PM Narendra Modi : जागतिक अनिश्‍चिततेत राष्ट्रहित जपणार; ‘स्वदेशी’ वापरण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

Harshwardhan Sapkal : काँग्रेसचा विचार हा पाकिस्तानचे दोन तुकडे करणारा

Rahul Mote : परंडा मतदारसंघांमध्ये पुन्हा वाजणार का? 'घड्याळाची ठकठक' घड्याळ तेच वेळ नवी!

MP Nilesh Lanke : अहिल्यानगर शहर पोलिस प्रशासनावर राजकीय दबाव; खासदार नीलेश लंके यांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT