Kosi_River 
देश

कमालच झाली बुवा! बिहारमध्ये चक्क विकली वाहती नदी

उज्वलकुमार

पाटणा : अतर्क्य, कल्पनेच्या पलीकडच्या गोष्टींचं आपल्याला नेहेमीच आकर्षण आहे. पंचतंत्रातील गोष्टी असो वा पुराणकथा, त्यातील अतिशयोक्ती आपल्याला नेहेमीच खुणावते. अशीच एक घटना बिहारमध्ये दिसून आली आहे. एक वाहती नदीच विकली गेल्याचे अनोखे प्रकरण उघडकीस आले आहे. ही चक्रावणारी घटना घडली आहे बिहारच्या भागलपूरमध्ये.

बिहारचे अश्रू म्हटली जाणारी कोसी नदी काही नाठाळांनी विकत घेतली. दुष्काळात जमिनींचे सर्वेक्षण सुरू झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. गावात जमिनीच्या वादातून काही लोकांनी कोसी नदीचा मालकी हक्क आपल्या नावावर करून घेतला. राज्य सरकार या फसवेगिरीतून मार्ग काढण्यासाठी कारवाई करीत आहे.

भागलपूर जिल्हा मुख्यालयापासून ४० कि. मी. लांब बिहपूर भागातील ऐतिहासिक गुवारीडीह टिला भागात ही गमतीशीर घटना घडली आहे. टिला म्हणजे एखादी छोटी टेकडी. या भागातून कोसी नदी वर्षभर खळाळत वाहते. पावसाळ्यात नदीचे काठही दिसत नाहीत इतका नदीचा प्रवाह भयानक असतो. या भागातील काही स्थानिकांनी जीवनदायिनी कोसी नदीचे एक एकर वीस गुंठ्याचे क्षेत्र आपल्या नावावर केले. २० डिसेंबर २०२० रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या भेटीत गुवारीडीह टिला या भागाला महत्त्वाचे ऐतिहासिक स्थळ बनवण्याच्या दृष्टीने आदेश दिले होते. यासंबंधी काम सुरू असताना हा अजब प्रकार उघडकीस आल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सर्वजण गोंधळात पडले.

‘या भागातील जमीन सर्वेक्षण रद्द करण्याच्या प्रस्तावावरील सुनावणी दरम्यान काही लोकांनी कोसी नदीचे एक एकर वीस गुंठे क्षेत्र आपल्या नावावर केल्याची बाब लक्षात आली. ही ताबेदारी निकालात काढण्याचा प्रस्ताव बिहपूरच्या अधिकाऱ्यांकडून मागविला आहे. यानंतर हे अधिग्रहण रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल’.
- राजेश झा राजा, अतिरिक्त जिल्हाधिकारी, भागलपूर

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT