krishna idols buried under stairs jama masjid devkinandan maharaj filed excavation petition agra 
देश

Agra Jama Masjid : जामा मशिदीच्या पायऱ्याखालची कृष्ण मुर्ती बाहेर येणार? कोर्टाने स्वीकारली याचिका

सकाळ डिजिटल टीम

उत्तर प्रदेशातील आग्रा येथील श्री कृष्णजन्मभूमी संरक्षित सेवा ट्रस्टचे संरक्षक कथावाचक देवकीनंदन महाराज यांनी मथुरेच्या केशवदेव मंदिरातील मूर्ती आग्राच्या शाही जामा मशिदीच्या पायऱ्यात गाडल्या गेल्याचे दावा केला आहे. त्यांनी या मुर्ती बाहेर काढण्यात याव्यात अशी देखील मागणी केली आहे.

सध्या आग्रा येथील जामा मशीदीच्या पायऱ्यांचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला असून या पायऱ्या खोदण्यासाठी कथावाचक देवकीनंदन ठाकून यांनी कोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणातील याचिका कोर्टाने स्वीकारली आहे.

याप्रकरणी कोर्टाने उत्तर देण्याकरीता जामा मशिद इंतजामिया कमेटी, छोटी मशिद, दीवान ए खास, जहांआरा मशिद, आग्रा किल्ला, यूपी सेंट्रल वक्फ बोर्ड लखनऊ आणि श्रीकृष्ण सेवा संस्थान यांना नोटीस जारी करण्यात आली आहे. या प्रकरणातील सर्व पक्षांना ३१ मे पर्यंत त्यांची बाजू मांडण्यास सांगण्यात आले आहे.

जामा मशिदीच्या पायऱ्यांमध्ये भगवान कृष्णाच्या मुर्ती गाडण्यात आल्याचे या दाव्यामध्ये म्हटले आहे. या पायऱ्या खोदून मुर्ती बाहेर काढाव्यात. या संदर्भात सिव्हील कोर्टाने नोटीस बजावून सुनावणीसाठी ३१ मेची तारीख निश्चित केली आहे.

सोमवारी देवकीनंदन महाराज यांनी सांगितले की ११ मे रोजी त्यांनी ट्रस्टच्या वतीने न्यायालय सिव्हील जज (प्रवर खंड), आग्रा यांच्यासमोर केस क्रमांक ५१८/२३ दाखल केली होती. यामध्ये आग्रा येथील मशिदीच्या (जहानारा बेगम मशिद) पायऱ्यांमध्ये दफन केलेल्या भगवान केशवदेवांच्या देवतांना परत मिळवून देण्याची विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे.

ट्रस्ट संरक्षक कथावाचक देवकीनंदन ठाकुर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, त्यांनी मागच्या माहिन्यात भागवत कथेदरम्यान आग्रा येथे बंधुत्वाचे आवाहन करत मुर्ती परत करण्याची मागणी केली होती. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नाइलाजास्तव न्यायालयाची मदत घ्यावी लागली. जामा मशीदीच्या पायऱ्या खोदल्यानंतर परिस्थीती स्पष्ट होईल.

ते पुढे म्हणाले की, मुघल शासक औरंगजेबाने १६७० मध्ये मथुरा येथे केशवदेव मंदिर तोडण्यात आलं. त्याने केशवदेव यांची मुर्ती आग्रा येथील जामा मशीदीच्या पायऱ्याखाली पुरली. औरंगजेब याच्याशी समकालीन इतिहासकारांनी याचे वर्णन त्यांच्या पुस्तकात केलं आहे. त्यामुळे मुर्त्या बाहेर काढल्या पाहिजेत, जेणेकरून त्यांची पूजा केली जाऊ शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

Video: D Gukesh विरुद्ध विजय मिळवताच नाकामुरानं 'किंग' प्रेक्षकांमध्ये फेकला, अमेरिकन खेळाडूच्या सेलिब्रेशनवरून वाद

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

SCROLL FOR NEXT