Kuldeep Bishnoi Latest News Kuldeep Bishnoi Latest News
देश

Kuldeep Bishnoi : बिश्नोई यांचा आमदारकीचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश करणार

बिश्नोई यांची काँग्रेसने सर्व पक्षीय पदांवरून हकालपट्टी केली होती

सकाळ डिजिटल टीम

चंदीगड : कुलदीप बिश्नोई (Kuldeep Bishnoi) यांनी हरयाणाच्या आदमपूर मतदारसंघाच्या आमदारकीचा राजीनामा (Resigns MLA) दिला आहे. हरयाणा विधानसभा अध्यक्षांकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे. ते आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करू शकतात. या जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत ते आपल्या मुलाला उभे करू शकतात, असे बोलले जात आहे.

कुलदीप बिश्नोई (Kuldeep Bishnoi) यांनी हिसार लोकसभा मतदारसंघातून स्वत:साठी भारतीय जनता पक्षाकडून (BJP) तिकीट मागितल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. बिश्नोई यांनी चंदीगडमध्ये (Chandigarh) हरयाणा विधानसभा अध्यक्ष ग्यानचंद गुप्ता यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर हिस्सार जिल्ह्यातील आदमपूर जागेवर पोटनिवडणूक घेण्याची वेळ आली आहे.

जूनमध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाल्यानंतर लगेचच बिश्नोई यांची काँग्रेसने सर्व पक्षीय पदांवरून हकालपट्टी केली होती. चार वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार राहिलेले बिश्नोई हे पक्षावर आधीच नाराज होते.

या वर्षाच्या सुरुवातीला बिश्नोई यांनी हरयाणा प्रदेशाध्यक्षपदासाठी पक्षाकडून दुर्लक्ष केल्याने बंड पुकारला होता. कुलदीप बिश्नोई हे हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भजन लाल यांचे धाकटा मुलगा आहे. यापूर्वीही त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT