Kumar_Vishwas 
देश

'जेव्हा देव स्वत: आपला देश चालवत आहेत...'; काय म्हणाले कुमार विश्वास?

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : ट्विटरवर सतत सक्रिय असणारे कवी आणि आम आदमी पक्षाचे माजी नेते कुमार विश्वास यांनी एअरपोर्ट आणि एअरलाइन्सचे खासगीकरण करण्याच्या मुद्द्यावर ट्विट केले आहे. यावेळी त्यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या विधानावर निशाणा साधला आहे. पुरी यांनी म्हटले आहे की, सरकारने विमान कंपन्या आणि विमानतळ चालवू नयेत. याचा खरपूस समाचार घेत कुमार विश्वास यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मग सरकारनेही सरकार चालवू नये.

'एनडीटीव्ही' या इंग्रजी वृत्तवाहिनीची बातमी शेअर करत ट्विट केले आहे की, 'हो, बरोबर आहे! जेव्हा देव स्वत: आपला देश चालवत आहेत, तेव्हा आपण राष्ट्रीय विमानतळ, राष्ट्रीय रेल्वे, राष्ट्रीय बंदरे, विद्यापीठे, राष्ट्रीय महामार्ग, रुग्णालये, विद्युत कंपन्या इ. का चालवाव्यात? सरकारनेही सरकार चालवू नये. भारतमातेचा विजय असो!'

दरम्यान, रविवारी (ता.३०) एका डिजिटल बैठकीत हरदीपसिंग पुरी म्हणाले की, "मी मनापासून सांगू इच्छितो की सरकारने विमानतळ चालवू नये आणि सरकारनेही विमानसेवा चालवू नये."

त्याचबरोबर त्यांनी एअर इंडिया या सरकारी विमान कंपनीच्या खासगीकरणाचा उल्लेखही केला. एअर इंडियासाठी योग्य निविदा मिळाल्यास त्याचे खाजगीकरण केले जावे. या वर्षाच्या अखेरीस ही सरकारी विमानसेवाही खासगी होईल, अशी अपेक्षा पुरी यांनी व्यक्त केली.

देशभरातील विमानतळांच्या खासगीकरणाबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. केरळमधील तिरुअनंतपुरम विमानतळ हे केंद्र सरकारने ५० वर्षांसाठी अदानी समूहाला भाड्याने दिले आहे. यास केरळ सरकारनेही विरोध दर्शविला आहे.

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM 1st T20I: गौतम गंभीर भारतीय संघासोबत झिम्बाब्वेत का नाही? मुख्य प्रशिक्षक मग कोण? BCCI ने घेतला निर्णय

Anna Hazare: विद्यार्थ्यांसाठी मूक आंदोलन पुकारलं; अण्णा हजारेंना रडू कोसळलं, भावनिक व्हिडिओ व्हायरल, कारण काय?

Mumbai Pollution: पृथ्वीला प्रदूषणाचा विळखा, पीओपी बंदीचे समर्थन; याचिकाकर्त्यांचा न्यायालयात युक्तिवाद

Latest Marathi Update : सोनम वांगचुक यांना दिले जाणारे सर्व उपचार त्यांच्या संमतीनेच केले जात आहेत - मेदान्ता रुग्णालय

Indigenous Rice Aambegaon: आंबेगावात दुर्मिळ देशी भात वाण संवर्धनासाठी लागवड प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT