haridwar kumbh mela 
देश

कोरोना आहे की नाही इथं? कुंभमेळ्यात सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर

सकाळ डिजिटल टीम

हरिद्वार - देशात कोरोनाची दुसरी लाट असतानाही अनेक ठिकाणी लोकांची गर्दी आणि मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन होताना दिसत आहे. हरिद्वारमध्ये महाकुंभ सुरु असून आज दुसरं शाही स्नान होत आहे. यामध्ये आखाड्यामधील साधु संत स्नान करत आहेत. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन होत असून पोलिस अधिकारीसुद्धा हतबल झाले आहेत. हजारोंच्या संख्येनं स्नानासाठी गर्दी झाली आहे. 

प्रचंड गर्दी असल्यानं अनेक ठिकाणी कोरोनाच्या प्रोटोकॉलचं उल्लंघन केलं जात आहे. कोणीही मास्क लावलेले नाहीत, सोशल डिस्टन्सिंगचं पालन होत नाहीय. कुंभ मेळा आयजी संजय गुंजाल यांनी म्हटलं की, शाही स्नानात सर्वात पहिल्या आखाड्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर सात वाजता सर्वसामान्यांना शाही स्नान करण्यात आलं आहे. 

संजय गुंजाल म्हणाले की, आम्ही लोकांना सातत्यानं कोरोनाच्या प्रोटोकॉलचं पालन करा असं आवाहन करत आहे. मात्र मोठ्या गर्दीत नियम पाळले जात नसल्याचं निदर्शनास येत आहे. या लोकांवर कारवाई करणंही गर्दीमुळे शक्य नाही. घाटांवर सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं खूपच कठीण आहे. जर आम्ही सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यासाठी आग्रह केला तर चेंगराचेंगरीची परिस्थिती उद्भवेल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. 

शाही स्नानाच्या एक दिवस आधी उत्तराखंडमध्ये कोरोनाचा उद्रेक बघायला मिळाला. गेल्या 24 तासात 1 हजार 333 नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडले. तर 8 जणांचा मृत्यू झाला. डेहराडूनमध्ये 582, हरिद्वारमध्ये 386 आणि नैनितालमध्ये 122 कोरोनाचे रुग्ण सापडले. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Greater Noida Bus Fire : यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या स्लीपर बसला भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू , जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी टाकल्या उड्या

Barshi Drought: साहेब, पाणीच नाही तर लग्नेही जमत नाहीत’; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे साकडे

Marathwada Rain: ५० दिवसांच्या खंडानंतर मराठवाड्यात पाऊस; हिंगोली, जालना, नांदेडसह धाराशिवमध्ये सरी

Maharashtra Rain Alert : कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव; यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीत मुसळधार पावसाची शक्यता

Global Warming: ‘सुपर एल निनो’मुळे १५ हजार मृत्यूचा धोका; शिकागो विद्यापीठाचा इशारा, जमीन आणखी तापणार

SCROLL FOR NEXT