Cheetah Shaurya Passed Away  
देश

Cheetah Shaurya Passed Away: नामिबियातून कुनो राष्ट्रीय उद्यानात आणलेल्या आणखी एका चित्त्याचा मृत्यू

नामिबियातून कुनो राष्ट्रीय उद्यानात आणलेल्या आणखी एका चित्त्याचा मंगळवारी मृत्यू झाला. मृत चित्त्याचे नाव शौर्य असे असून कुनोतील आतापर्यंत मरण पावलेला हा दहावा चित्ता आहे.

सकाळ वृत्तसेवा

Cheetah Shaurya Passed Away

इंदूर: नामिबियातून कुनो राष्ट्रीय उद्यानात आणलेल्या आणखी एका चित्त्याचा मंगळवारी मृत्यू झाला. मृत चित्त्याचे नाव शौर्य असे असून कुनोतील आतापर्यंत मरण पावलेला हा दहावा चित्ता आहे.

अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि सिंह प्रकल्पाच्या संचालकांच्या निवेदनानुसार आज सकाळी ११ च्या सुमारास नामिबियातून आणलेल्या शौर्य चित्त्याचे वागणे सामान्य नसल्याचे जाणवले.

निगरानी पथकाने त्याला बेशुद्ध केले. काही काळासाठी तो शुद्धीवर आला पण तो खूप थकलेला होता. त्याने ‘सीपीआर’ला प्रतिसाद देणे थांबविले आणि दुपारी तीन वाजून १७ मिनिटांनी त्याचा मृत्यू झाला.

शौर्यच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदनानंतर समजणार आहे. ‘प्रोजेक्ट चिता’अंतर्गत डिसेंबर २०२२ रोजी नामिबियातून आठ चित्ते आणि २०२३च्या सुरुवातीस दक्षिण आफ्रिकेतून १२ चित्ते आणले होते. कुनो उद्यानात मार्च २०२३ पासून आतापर्यंत तीन पिल्लांसह दहा चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT