Kuno National Park esakal
देश

Kuno National Park : भारतात पाळणा हलला! नामिबियातून आणलेल्या 'सिया' चित्तानं दिला चार पिल्लांना जन्म

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) कुनो राष्ट्रीय उद्यानातून (Kuno National Park) देशासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलीये.

सकाळ डिजिटल टीम

भारतातील शेवटचा चित्ता 1947 मध्ये सध्याच्या छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यात मरण पावला आणि 1952 मध्ये ही प्रजाती नामशेष झाल्याचं घोषित करण्यात आलं.

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) कुनो राष्ट्रीय उद्यानातून (Kuno National Park) देशासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलीये.

नामिबियातील 'सिया' या मादी चित्तानं (Namibian Cheetah) चार पिल्लांना जन्म दिलाय. मिळालेल्या माहितीनुसार, मादी चित्ता आणि चार लहान पिल्लं सध्या पूर्णपणे निरोगी आहेत. नवीन पाहुणे आणि मादी चिता यांची विशेष टीम काळजी घेत आहे.

चित्ता संवर्धन प्रकल्पाशी निगडित अधिकाऱ्यांनी नवीन पाहुण्यांच्या आगमनावर आनंद व्यक्त केलाय. त्यांनी सांगितलं की, 'कुनो नॅशनल पार्कमधील चित्ते त्यांच्या नवीन वातावरणाशी उत्तम प्रकारे जुळवून घेत असल्याचं सकारात्मक लक्षण आहे.'

72 व्या वाढदिवसानिमित्त PM मोदींनी मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून आणलेले पाच नर आणि तीन मादी चित्त्यांचा समावेश असलेले आठ चित्ते सोडले होते. अलीकडंच एक मादी चित्ता 'साशा'चा संसर्गामुळं मृत्यू झाला.

दोन दिवसांपूर्वी 'साशा'चा मृत्यू

नामिबियातील साशा ही मादी चित्ता सोमवारी, 27 मार्च रोजी कुनो नॅशनल पार्कमध्ये मृतावस्थेत आढळून आली. मादी चित्ताची किडनी निकामी झाली होती. या बातमीनं देशात चित्त्यांचं पुनर्वसन करू इच्छिणाऱ्या वन्यजीवप्रेमींना धक्का बसला. मात्र, चार पिल्लं एकत्र जन्माला आल्यानंतर आता चित्त्यांच्या देशात पुन्हा स्थायिक होण्याच्या आशा पल्लवित होताना दिसत आहेत.

कुनोमधील चित्त्यांची संख्या वाढली

गेल्या वर्षी 17 सप्टेंबरला नामिबियातून आठ चित्ते आणून कुनो इथं सोडण्यात आले होते, तर 18 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्त्यांची आणखी एक तुकडी भारतात आणण्यात आली होती. या 12 चित्त्यांमध्ये सात नर आणि पाच माद्या होत्या. या सर्व चित्त्यांसह सध्या कुनोमधील चित्त्यांची संख्या 23 झाली आहे.

1952 मध्ये देशात चित्ता नामशेष

भारतातील शेवटचा चित्ता 1947 मध्ये सध्याच्या छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यात मरण पावला आणि 1952 मध्ये ही प्रजाती नामशेष झाल्याचं घोषित करण्यात आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT