india china
india china esakal
देश

India-China Tawang Clash: गलवानची पुनरावृत्ती! तवांगमध्ये भारत-चीनचं सैन्य एकमेकांना भिडलं; 30 जखमी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : गलवान खोऱ्यात झालेल्या भारत-चीन सैन्याच्या झटापटीच्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. ९ डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये पुन्हा एकदा भारत-चीनचे सैनिक एकमेकांना भिडले आहेत. यामध्ये ३० जवान जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. यावर भारताकडून आणि चीनकडून कुठलंही स्पष्टीकरण अद्याप आलेलं नाही. (LAC Indo Chinese forces clashed in Tawang at Arunachal Pradesh)

एएनआयच्या वृत्तानुसार, ९ डिसेंबर २०२२ रोजी पिपल्स लिबरेश आर्मी (PLA) अर्थात चीनच्या सैन्याच्या ट्रूप्सची भारतीय सैन्यासोबत अरुणाचलच्या तवांग प्रांतात झटापट झाली. या झटापटीत दोन्ही बाजूंकडील सैनिक किरकोळ जखमी झाले आहेत. यानंतर दोन्ही बाजूंकडील सैन्यानं ताबडतोड संबंधित एरियातून माघार घेतली.

दरम्यान, सन 1962 मध्ये भारत-चीन युद्धानंतर तब्बल ४५ वर्षांनंतर १५ जून २०२० रोजी लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये पुन्हा एकाद भारत-चीनचे सैनिक एकमेकांना भिडले होते. त्यांच्यामध्ये शस्त्रांचा वापर झाला नसला तरी लोखंडी काट्याच्या तारांसह त्यांनी एकमेकांवर हल्ला चढवला होता. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले होते तर त्यापेक्षा अधिक चीनचे सैनिक ठार झाले होते. यामुळं भारत-चीन यांच्यातील द्विपक्षीय संबंध अत्यंत तणावाचे बनले होते.

हेही वाचा - सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

गलवानच्या घटनेचे भारतात मोठे पडसाद उमटले होते. भारतीयांनी चीनी वस्तूंच्या वापरावर बंदी घातली होती. तसेच केंद्र सरकारनेही याबाबत मोठं पाऊल उचलत चीनी वस्तूंच्या आयातीवर तसेच चीनी मोबाईल्स आणि अॅप्सवर बंदी आणली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT