lack of essential items medicines leads to desperation in manipur hills sakal
देश

Manipur : मणिपूरमध्ये जीवन- मरणाचा संघर्ष; औषधे, उपचारासाठी आवश्यक उपकरणांची टंचाई

केंद्र सरकारच्या आवाहनानंतर कुकी समुदायाने ‘राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-२’ वरील रास्ता रोको आंदोलन मागे घेतले

सकाळ वृत्तसेवा

चुराचांदपूर (मणिपूर) : मणिपूरमधील हिंसाचारामुळे औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंची सर्वत्र भीषण टंचाई निर्माण झाल्याने राज्यातील रुग्णांच्या वैद्यकीय समस्या वाढू शकतात अशी भीती व्यक्त होत आहे.

केंद्र सरकारच्या आवाहनानंतर कुकी समुदायाने ‘राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-२’ वरील रास्ता रोको आंदोलन मागे घेतले असले तरीसुद्धा मैतेई समुदायाने चुराचांदपूरच्या दिशेने होणारी वाहतूक अद्याप रोखलेलीच असल्याने तिथे जीवनावश्यक वस्तूंची भीषण टंचाई निर्माण झाली आहे.

चुराचांदपूर हा मणिपूरमधील सर्वांत मोठा जिल्हा असून तिथे कुकी समुदायाचे प्राबल्य आहे. या जिल्ह्याची लोकसंख्या तब्बल चार लाख एवढी असून हिंसाचारामुळे दहा हजार लोकांना छावण्यांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे.

राज्यात डॉक्टर आणि अन्य शल्य चिकित्सकांची भीषण टंचाई निर्माण झाली असून हे सगळे आता धोक्याच्या पातळीवर पोचले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. डायलिसिससाठीची उपकरणे, कर्करोग आणि एचआयव्हीवरील उपचारासाठी वापरण्यात येणारी औषधे यांची टंचाई निर्माण झाल्याने त्यांचे विपरीत परिणाम रुग्णांच्या आरोग्यावर होऊ शकतात,

अशी भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान पश्चिम इंफाळ आणि कांगपोकपी या जिल्ह्यांना लागून असलेल्या दोन खेड्यामध्ये झालेल्या हिंसाचारात एक नागरिकाचा मृत्यू झाला तर अन्य दोघेजण जखमी झाले आहेत. दोन गटांमध्ये सोमवारी ही चकमक झाल्याचे बोलले जाते.

गोळीबारात जखमी झालेले अधिक

चुराचांदपूरमध्ये चार लाख लोकसंख्येसाठी येथे सर्वांत मोठे रुग्णालय उभारण्यात आले असून शनिवारपर्यंतची आकडेवारी लक्षात घेतली तर येथे गोळीबारात जखमी झालेल्या तब्बल २८८ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.

राज्यामध्ये जातीय दंगली भडकल्यापासून गोळीबारामध्ये जखमी होणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर केंद्र सरकारने या भागामध्ये डॉक्टरांची सहा पथके पाठविली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train: लोकलमधील AC १० मिनिटांपासून बंद, गुदमरून तीन प्रवाशी बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

Konkan Railway : बाप्पाच्या आगमनासाठी कोकणात कधी जायचंय? रेल्वे आरक्षणाचे संपूर्ण वेळापत्रक आले समोर, एका क्लिकवर पहा

आधी 'हनिमून'साठी सजावट, आता चक्क 'पुजा-अर्चा'; रेल्वेच्या डब्यांमध्ये नेमकं चाललंय तरी काय? VIDEO समोर...

Latest Marathi News Live Update : मृत वारकऱ्यांच्या नातेवाईकांना चार लाखाची मदत; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

Video : जगातला अनोखा विवाहसोहळा! दोन रोबोट्सनी केलं लग्न; खऱ्या वधू-वराप्रमाणे बांधली सात जन्माची गाठ, व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण

SCROLL FOR NEXT