देश

महिला सरपंचाची 11 कोटींची संपत्ती, भ्रष्टाचाराच्या तक्रारीनंतर छाप्यात उघड

सकाळ डिजिटल टीम

महिला सरपंचाच्या घरी लोकायुक्तांनी टाकलेल्या छाप्यात संबंधित महिलेच्या नावावर ११ कोटींची संपत्ती असल्याचं समोर आलं आहे. मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील बैजनाथ गावच्या महिला सरपंचाची संपत्ती पाहून अधिकारी आणि कर्मचारीही अवाक् झाले. लोकायुक्तांनी कारवाई करताना ११ कोटी रुपयांहून अधिक संपत्ती असल्याचं उघड केलं आहे.

गावच्या महिला सरपंच सुधा सिंह यांचा अलिशान बंगला असून कोट्यवधी रुपये किंमतीची वाहने आहेत. तसंच सोने चांदीचे दागिने, जमीन यासह क्रशर, जेसीबी यांसारखी मशिन्ससुद्धा आहेत. या सगळ्या मालमत्तेची अंदाजे किंमत ११ कोटी रुपयांहून जास्त आहे.

सुधा सिंह यांनी एक एकर आवारात अलिशान बंगला बांधला असून त्यात स्विमिंग पूलसुद्धा तयार करण्यात आला आहे. लोकायुक्त या प्रकरणाची चौकशी करत असून आतापर्यंत २० हून अधिक जमिनी, वाहने, अलिशना बंगला, क्रशर, सोने, चांदी आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. भ्रष्टाचाराची तक्रार मिळाल्यानंतर लोकायुक्तांनी न्यायालयातून सर्च वॉरंट घेतलं होतं. यामध्ये आतापर्यंत कोट्यवधींची मालमत्ता उघडकीस आली आहे. यात आणखी काही संपत्ती असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महिला सरपंचांच्या दोन ठिकाणांवर छापा मारण्यात आला. बैजनाथ गावात आणि शारदापुरम कॉलनीमध्ये एकाच वेळी टाकण्यात आलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणावर मालमत्ता आढळून आली. यामध्ये दोन घरांची किंमत अंदाजे प्रत्येकी दोन कोटी रुपयांपर्यंत असल्याचं म्हटलं आहे. तसंच मोठी ३० वाहने आणि भूखंड आणि रोख रक्कम मिळून ११ कोटींहून अधिक किंमत आहे. लोकायुक्तांनी त्यांच्या टीमसह दोन्ही ठिकाणी छापा टाकून संपत्ती जप्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manchar Accident : दोन भीषण अपघातांत खेड तालुक्यातील दोघांचा व आंबेगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर....

आकाश पाळण्यात महिलेचे केसं अडकले, केसांसह चामडी निघाली; तांन्हा पोळ्याच्या यात्रेत थरारक घटना

Kaygaon News : गोदावरीत उडी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या अल्पवयीन मुलाचे पोलिसांनी वाचवले प्राण

Sangli Mahanagarpalika Bharti : महापालिकेत भरतीचा मार्ग मोकळा; टाटा कन्सल्टन्सीला दिला कंत्राटाचा कार्यादेश, 82 रिक्त पदांपैकी 41 पदांसाठी भरती

SCROLL FOR NEXT