CM Yogi Adityanath sakal
देश

लखीमपूर घटनेत कोणीही दोषी असला तरी कडक कारवाई होईल - CM योगी

उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये घडलेल्या घटनेत चार शेतकऱ्यांसह, आठ जणांचा मृत्यू झाला.

सुधीर काकडे

उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये आंदोलक शेतकरी आंदोलनादरम्यान मोठा संघर्ष झाला. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्री टेनी यांच्या समोर निदर्शनं करण्याच्या प्रयत्नात रोडवर उभे असलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी गेल्याने चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तर या घटनेत एकून ८ लोकांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये घडलेल्या या घटनेत आंदोलक शेतकरी आणि मंत्र्यांच्या ताफ्यातील लोकांमध्ये संघर्ष झाल्याची माहिती मिळते आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घालून, त्यांना चिरडल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आता याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे.

काय म्हणाले योगी आदित्यनाथ ?

"लखीमपूर घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच अशा घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. सरकार या घटनेच्या कारणांच्या मुळाशी जाऊन या प्रकरणाचा तपास करेल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. घटनास्थळी शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित असून, या घटनेवर नियंत्रण ठेऊन सखोल तपास करत आहेत. त्यामुळे या घटनेत जे लोक दोषी असतील, सरकार त्यांच्या विरोधात कडक कारवाई करेल. लोकांना आवाहन आहे की, त्यांनी आपल्या घरात थांबावे, कुणाच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता, शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मदत करावी. कोणत्याही निष्कर्शापर्यंत पोहोचण्यापूर्वी घटनेचा तपास होई पर्यंत वाट पाहावी." अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Sandeep Karnik : नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, नेमकं प्रकरण काय? २०१९ मध्ये काय घडलं होतं?

ICUत उंदराने कुरतडला हात, १२ तासांत महिला रुग्णाचा मृत्यू; रुग्णालयाने डॉक्टरसह नर्सवर केली कारवाई

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरातील बिंदू चौकात गॅस गळतीमुळे आग

LPG Import India : गॅस संकट कमी होणार ! कतारहून भारतात आणला ४६,००० मॅट्रिक टन LPG; तब्बल 'इतके' लाख सिलिंडर्स भरणार

Chhatrapati Sambhajinagar News: लातूर-नांदेडला अवकाळी पावसानं झोडपलं, वीज कोसळून १६ वर्षीय मुलीचा मृत्यू; वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान

SCROLL FOR NEXT