Lakhimpur Kheri Violence Case esakal
देश

Lakhimpur Kheri : आरोपी आशिष मिश्राला SC कडून अटीशर्थींसह अंतरिम जामीन मंजूर

जामीन मंजूर करताना न्यायालयाने मिश्राला अनेक सूचना तसेच अटी घातल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Lakhimpur Kheri violence : लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपी आशिष मिश्राला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

हेही वाचा - 'नाटू नाटू..'ला मिळाला पुरस्कार..पण पुढे काय?

जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने मिश्राला अनेक सूचना तसेच अटी घातल्या आहेत. 8 आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर करताना कोर्टाने मिश्राला दिल्ली आणि यूपीमध्ये वास्तव्यास मनाई केली आहे. जामीन मिळाल्यानंतर मिश्राला आठवडाभरात उत्तर प्रदेश सोडावे लागणार आहे.

जर, आशिष मिश्रा किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी खटल्याशी संबंधित साक्षीदारांवर दबाव टाकण्याचा किंवा खटल्याला उशीर करण्याचा प्रयत्न केला तर,जामीन रद्द केला जाईल, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

काय म्हणाले शेतकरी नेते राकेश टिकैत?
लखीमपूर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जर सर्वोच्च न्यायालय म्हणत असेल की, मिश्राच्या कुटुंबाने कोणालाही धमकावले नाही आणि त्यांची वागणूक चांगली आहे, तर हा खोटा युक्तिवाद असल्याचे टकैत यांनी म्हटले आहे. 

असा युक्तिवाद प्रत्येकाने द्यायला हवा, असे म्हणत हा युक्तिवाद लक्षात घेऊन इतर 302 प्रकरणांमध्ये तसेच खुनाच्या गुन्ह्यांमध्येही जामीन द्यावा अशी मागणी टिकैत यांनी केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
3 ऑक्टोबर 2021 रोजी, लखीमपूर खेरीच्या टिकुनिया येथे 8 जणांना वाहनाने चिरडून ठार केले होते. शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या वाहनात आशिष मिश्रा होता असा आरोप शेतकऱ्यांचा आहे. या आरोपाच्या आधारे आशिष मिश्राला पोलिसांनी हत्येचा आरोपी मानत अटक केली होती. अखेर आज सर्वोच्च न्यायालयाने मिश्राला अटी-शर्थींसह जामीन मंजूर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ७ महिने झाले अनाथांना मिळाले नाहीत बालसंगोपन योजनेचे पैसे; राज्यातील सव्वालाख चिमुकल्यांचे हाल; दरमहा अपेक्षित आहेत २२५० रुपये

आजचे राशिभविष्य - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

SCROLL FOR NEXT