Lal Bahadur Shastri  esakal
देश

Lal Bahadur Shastri: शास्त्रींच्या मृत्यूचे गूढ? नातवांनीच पाठवलेली 'ताश्कंद'च्या दिग्दर्शकाला नोटीस

शास्त्रींचे नातू विभाकर आणि दिवाकर शास्त्री यांनीच चित्रपटाचे प्रोड्यूसर विवेक अग्रिहोत्री यांना लीगल नोटीस बजावली होती

सकाळ ऑनलाईन टीम

Lal Bahadur Shastri: 'द ताश्कंद फाइल' हा चित्रपट रिलीझ होण्यापूर्वीच देशात चर्चेचा मोठा विषय होता. आज लाल बहादूर शास्त्रींची पुण्यतिथी. मात्र त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अजूनही गुढच आहे. त्यांच्या जीवनावरील चित्रपट निघाला तेव्हा मात्र देशात खळबळ उडाली.

देशात विविध चर्चांना तोंड फुटले. एवढेच नव्हे तर हा चित्रपट रिलीज होऊ नये म्हणून शास्त्रींचे नातू विभाकर आणि दिवाकर शास्त्री यांनीच चित्रपटाचे प्रोड्यूसर विवेक अग्रिहोत्री यांना लीगल नोटीस बजावली होती.

शास्त्रींच्या जीवनावर आधारित या चित्रपटावर एवढे प्रश्न का उपस्थित झालेत आणि त्यांच्याच नातवंडांनी त्यांच्या आजोबांचा चित्रपटाला रिलीझ होऊ नये म्हणून लीगल नोटीस का पाठवली असेल हा प्रश्नही तुम्हाला पडलाच असेल. तेच कारण आज आपण जाणून घेणार आहोत.

लाल बहादूर शास्त्रींचे नातू दिवाकर आणि विभाकर शास्त्री यांना हा चित्रपट रिलीज होऊ नये असे वाटण्यामागचे कारण म्हणजे त्यावेळी निवडणुकीची रणधूमान होती.

या चित्रपटाचा थेट परिणाम निवडणुकीच्या वातावरणावर होऊ शकतो असे शास्त्रींच्या नातवंडांचे म्हणणे पडले. तसेच शास्त्रींच्या मृत्यूबाबात त्यांना काहीही शंका नाही असेही ते म्हणाले होते.

नंतर शास्त्री कुटुंबाने त्यांना हा चित्रपट आधी दाखवण्यात यावा अशी मागणी केली होती. शास्त्री कुटुंबाकडून या चित्रपटाच्या ट्रेलरचं कौतुक झाल्यानंतर अचानक पाठवलेल्या नोटीसने सर्वांनाचा आश्चर्य झालं. (Murder Mistry)

पत्रकार परिषद घेऊन अग्निहोत्रींनी मात्र काँग्रेस कुटुंबियांवर याची खापर फोडली. काँग्रेसच्या महत्वाच्या कुटुंबांमुळे शास्त्री कुटुंबिय आमच्यावर खोटे आरोप लावताय असे ते म्हणाले.

ताश्कंद ही उझबेकिस्तानची राजधानी आहे. पूर्वी हा यूएसएसआरचा एक भाग होता. जिथे भारताचे दुसरे पंतप्रधान 1965 च्या युद्धानंतर पाकिस्तानशी महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षरी केल्याच्या दिवशी मरण पावले.

अधिकृतपणे त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले जात असले तरी, त्यांच्या मृत्यूचे षड्यंत्र असल्याच्या चर्चा आजही जगात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT