lalu prasad yadav 
देश

Lalu Yadav: भाजपसमोर झुकलो असतो तर तुरुंगात जावं लागलं नसतं; लालूंनी मौन सोडलं

सकाळ डिजिटल टीम

पाटणा - बिहारच्या पाटणा येथे आयोजित एका कार्यक्रमात आरजेडी नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. मी भाजप आणि मोदींपुढे नतमस्तक झालो असतो तर मला इतके दिवस तुरुंगात राहावे लागले नसते, असा टोला त्यांनी लगावला. ( Lalu Prasad Yadav news in Marathi)

लालू प्रसाद यादव यांनी प्रसार माध्यमांच्या भूमिकेचाही समाचार घेतला. माध्यमं आता मोदींचे हस्तक झाले आहेत. माध्यमांकडून एकच गोष्ट पुन्हा पुन्हा दाखवली जात आहे. यासोबतच भाजपवर निशाणा साधताना ते म्हणाले की, देशभरातील अनेक पक्षांनी दंगलखोर पक्षाशी तडजोड केली, पण मी झुकलो नाही आणि झुकणारही नाही, असं लालू यांनी ठणकावून सांगितलं.

लालू पुढं म्हणाले, मी त्यांच्यापुढे नतमस्तक झालो असतो तर कदाचित इतके दिवस मला तुरुंगात राहावे लागले नसते. भाजप हा देशाचा शत्रू आहे. मी त्यांच्यासोबत कधीही जाणार नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणूकसंदर्भात विचलेल्या प्रश्नावर लालू म्हणाले की, आपण लवकरच नितीश कुमार यांच्यासोबत दिल्लीला जाऊन काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! भाजपा आमदाराचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ, नेमकं काय घडलं?

Ambulance Policy: रुग्णांसाठी मोठा दिलासा! महाराष्ट्रात नवे अ‍ॅम्ब्युलन्स धोरण लागू; ४ अ‍ॅप्सशी जोडणार, जाणून घ्या नवी प्रणाली

Navi Mumbai: नवी मुंबईतील वृद्धाची कोट्यवधींची फसवणूक! डिजिटल अरेस्टच्या नावाखाली दीड महिना मानसिक छळ

Daund Kidnapping: दौंडमध्ये तरुणीचे मध्यरात्री अपहरण; माजी नगराध्यक्ष बादशहा शेखसह ११ जणांवर अपहरण, दरोडा, विनयभंगासह अतिउग्र गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : खासदार पप्पू यादव यांच्या विरोधात भाजपाचे नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT