landslide in kerala after heavy rain cm seeks help from iaf 
देश

केरळमध्ये भूस्खलनात पाच जणांचा मृत्यू; 80 अडकले

वृत्तसंस्था

तिरुअनंतपुरम: केरळमधील इडुक्की जिल्ह्यात भूस्खलन झाले असून, यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाय, 80 जण अडकले असून, त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी  वन अधिकारी आणि एनडीआरएफ दल कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे.

केरळमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून, अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. इडुक्की जिल्ह्यातील राजमला परिसरात झालेल्या भूस्खलनात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी सुरक्षा दलाचे जवान दाखल झाले असून, त्यांनी 10 जणांना सुरक्षित बाहेर काढले आहे. मुसळधार पावसामुले भूस्खलन झालेल्या ठिकाणी बचाव पथकाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिवाय, गावाला जोडणारा पूल पावसात वाहून गेला आहे. या भूस्खलनात चहा कामगारांची वीस घरे नष्ट झाली आहेत. आज (शुक्रवार) सकाळी ११.३०च्या सुमारास ही दुर्घटना घडली.

दरम्यान, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी भारतीय हवाई दलाकडे मदत मागितली असून, ट्विटदेखील केले आहे. ट्विटमध्ये त्यांनी घटनास्थळी एनडीआरएफ टीम दाखल झाली असल्याची माहिती दिली आहे. 'भूस्खलन झाल्याने अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी एनडीआरएफचे पथक पाठवण्यात आले आहे, पोलीस, अग्निशमन दल, वन तसंच महसूल अधिकारी यांना बचावकार्यात सहभागी होण्याचा आदेश दिला आहे. अजून एक टीम लवकरत घटनास्थळी दाखल होणार आहे,' अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde NCP President : प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे; शरद पवारांच्या पक्षात नेतृत्व बदल

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 जुलै 2025

Shubhanshu Shukla Return : पृथ्वीवर 'शुभ' अवतरण; शुभांशू शुक्ला वीस दिवसांनी परतले

आजचे राशिभविष्य - 16 जुलै 2025

Maharashtra Vidhan Sabha : देसाई विरुद्ध ठाकरे सामना रंगला, सरदेसाईही रिंगणात; सभागृह दहा मिनिटांसाठी तहकूब

SCROLL FOR NEXT