2000 Note Exchange esakal
देश

2000 Note Exchange : दोन हजारांची नोट कशी बदलायची? उरले मोजके दिवस

या नोटा बँकेत जमा करण्याची तारीख यानंतर वाढविण्यात येणार नाही. त्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते

सकाळ ऑनलाईन टीम

2000 Note Exchange : अजूनही तुमच्याकडे २००० रुपयांची नोट आहे का? असेल तर तुमच्याकडे आता कमी कालावधी उरला आहे. तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत ३० सप्टेंबरपर्यंत या नोटा बदलाव्या लागणार आहे. या नोटा बँकेत जमा करण्याची तारीख यानंतर वाढविण्यात येणार नाही. त्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते.

भारतीय रिझर्व्ह बँकेने यावर्षी मे महिन्यात २००० च्या नोटा चलनातून माघारी बोलविण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर २३ मे २०२३ रोजी नोटा परत घेण्याची कसरत सुरू झाली. या नोटांचे बाजारातील मूल्य संपणार नाही, पण त्या चलनात वापरण्यात येणार नाही, हे स्पष्ट आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने मे महिन्यात २००० रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याची घोषणा केली होती. रिझर्व्ह बॅंकेची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२३ आहे. त्यामुळे आता फक्त काहीच दिवस नोटा बदलवण्यासाठी शिल्लक आहेत.

नोट कशी बदलायची?

- जर तुमच्याकडे २,००० रुपयांची नोट असेल तर ती घेऊन रिझर्व्ह बँकेत जा.

- लक्षात ठेवा आरबीआयने बँकांना या नोटा बदलण्यासाठी त्यांचे स्वतःचे नियम ठरवण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.

- लक्षात ठेवा की रिझर्व्ह बँकेने लोकांना एका दिवसी २० हजार रुपयांपर्यंत म्हणजेच १० नोटा एकावेळी बदलण्याची सुविधा दिली आहे. त्याच्याकडे कोणतीही विचारपूस न करता नोट बदलवून देण्यात येतील.

- बँकेचे खाते नसेल तरीही तुम्हाला या नोटा बदलवून मिळतील. तुमच्याकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. एका दिवशी २० हजार रुपयांच्या नोटा बदलवता येतील. त्यामुळे नोटा उरल्या असतील तर झटपट बदलून घ्या. (Money)

३० सप्टेंबरनंतर या नोटांचे होणार काय ?

३० सप्टेंबरपर्यंत या नोटा बदलता येऊ शकतात. ३० सप्टेंबरपर्यंत नोटा जमा करता आल्या नाही, मुदतीनंतर या नोटा बँकेत एक्स्चेंज किंवा डिपॉझिट करता येणार नाहीत. ही नोट म्हणजे कागदाचा तुकडा होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT