Lata Mangeshkar Statue Indore Madhya Pradesh e sakal
देश

इंदूरमध्ये उभारणार लता दीदींचा पुतळा, भाजपच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा

सकाळ डिजिटल टीम

भोपाळ : भारतरत्न लता मंगेशकर यांचं रविवारी निधन (Lata Mangeshkar Demise) झालं. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आता मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये (Indore Madhya Pradesh) लता मंगेशकर यांचा पुतळा (Lata Mangeshkar) उभारण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या नावाने संगीत अकादमी देखील स्थापन केली जाणार आहे. याबाबत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Madhya Pradesh CM Shivraj Singh Couhan) यांनी आज घोषणा केली.

लता दीदींचा जन्म इंदूरमध्ये झाला होता. त्यामुळे त्यांच्या नावाने इंदूरमध्ये संगीत अकादमी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच संगीत महाविद्यालयात विद्यार्थ्यांना त्यांच्या गाण्याचं शिक्षण दिलं जाईल. एका संग्रहालय तयार करून आम्ही त्यात लता दीदींच्या सर्व गाण्याचं संग्रह करणार आहोत, असं शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं.

लता दीदी या फक्त संगीतापुरत्या मर्यादीत नव्हत्या. त्या एक सच्च्या देशभक्त होत्या. त्यांच्याकडून सर्वांना प्रेरणा मिळतेय. भावी पिढीला देखील ही प्रेरणा मिळावी यासाठी त्यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे, असंही सिंह म्हणाले. आज त्यांनी स्मार्ट सिटी पार्क येथे लता दीदींच्या स्मरणार्थ एक झाडं लावले. यावेळी भोपाळमधील संगीत क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते.

लतादीदींच्या निधनाने वैयक्तिक नुकसान झाल्याची भावना करोडो भारतीयांची आहे. त्यांच्या गाण्यांनी आपल्या सर्वांच्या जीवनात नवा उत्साह आणि ऊर्जा संचारली आहे. लता दीदींच्या जाण्यामुळे माझ्या स्वतःच्या आयुष्यात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा भावना शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol and Diesel Rate: पेट्रोल-डिझेलचे दर आणखी भडकणार? BPCL ने दिले मोठे संकेत; सर्वसामान्यांची चिंता वाढली

Samarth ITI Placements: समर्थ आयटीआयच्या ६ विद्यार्थ्यांची एक्साईड इंडस्ट्रीजमध्ये निवड; फिटर व इलेक्ट्रिशियन विभागाचा यशोगौरव

Jiregaon Painted Storks: जिरेगावच्या तलावात ‘चित्रबलाक’चा सुरक्षित मुक्काम; मातृत्व, प्रजनन आणि निरोगी परिसंस्थेचे जिवंत प्रमाणपत्र

MI vs RR: हार्दिक पांड्याने टॉस जिंकला, पण जसप्रीत बुमराहला Playing XI मधून बाहेर केलं; कारण काय सांगितलं?

Vidarbha Birds News : करणवाडी तलावात दुर्मिळ ‘लाँग-टोएड स्टिंट’चा शोध; पांढरकवडा वनक्षेत्रातील पाणथळ अधिवासांचे वैज्ञानिक दस्तऐवजीकरण तातडीचे

SCROLL FOR NEXT