Wrestlers Protest
Wrestlers Protest 
देश

Wrestlers Protest: जंतर मंतरवर 'मिड नाइट ड्रामा'; कुस्तीपटूंचा पोलिसांवर गंभीर आरोप, कुस्तीपटू विनेश फोगट रडली

धनश्री ओतारी

दिल्लीत जंतर मंतरवर मिड नाइट ड्रामा पाहायला मिळाला. धरणं आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कुस्तीपटू आणि पोलीस यांच्यात वादावादी आणि हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आपल्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप कुस्तीपटूंनी केला आहे. (Late night chaos at Jantar Mantar as protesting wrestlers claim police manhandled them )

स्टार खेळाडू बजरंग पुनिया आणि पोलीस यांच्यातील बाचाबाचीचा व्हिडीओही समोर आला आहे. तसेच, कुस्तीपटू विनेश फोगट एका व्हिडीओमध्ये रडताना दिसत आहे. कुस्तीपटू विनेश फोगट हिनं घडल्या प्रकारासंदर्भात अनेक गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

विनेश फोगटनं दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहून तक्रार दाखल केली आहे. आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवर पोलिसांनी जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप फोगटने पत्रात केला आहे. विनेशनं पोलीस आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत वरिष्ठ एसीपी धर्मेंद्र यांनी जंतरमंतरवरुन निघून जाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनाही धमकावल्याचं म्हटलं आहे.

विनेशनं वरिष्ठ एसीपी धर्मेंद्र यांनी गैरवर्तन केल्याचाही आरोप केला असून सर्व पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

बजरंग पुनियाचं शहांना पत्र...

कुस्तीपटू बजरंग पुनिया यानंही गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये पुनियाने चार मागण्या केल्या आहेत. कुस्तीपटूंवर हल्ला करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, वॉटरप्रूफ तंबू लावण्याची परवानगी द्या, असही पुनिया यांनी म्हटलं आहे.

दिल्ली पोलिसांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना किरकोळ वाद असल्याचे म्हटलं आहे. डीसीपी प्रणव तायल म्हणाले की, "जंतरमंतरवर कुस्तीपटूंच्या आंदोलनादरम्यान, आप नेते सोमनाथ भारती परवानगीशिवाय फोल्डिंग बेड घेऊन आंदोलनस्थळी आले.

आम्ही मध्यस्थी केल्यावर आंदोलन करणारे कुस्तीपटू आक्रमक झाले आणि त्यांनी ट्रकमधील बेड काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर किरकोळ बाचाबाची झाली आणि सोमनाथ भारती यांच्यासह अन्य दोघांना ताब्यात घेण्यात आलं."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: लाल किल्ल्यावरून सांगतो त्यांची प्रतिष्ठा वाढलीच पाहिजे.. अदानी अंबानीवर विचारलेल्या प्रश्नावर मोदींचे छातीठोक उत्तर

Chandu Champion : प्रतीक्षा संपली! 'या' दिवशी रिलीज होणार 'चंदू चॅम्पियन'चा ट्रेलर; चित्रपटातील 'त्या' सीनचं सिक्रेट कार्तिकने केलं उघड

Instagram Post Delete : इंस्टाग्रामच्या पोस्ट एकावेळेस एका क्लिकमध्ये डिलीट करायच्या आहेत? फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स

Sangli Crime : गुंगीचे औषध देऊन कॅफेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; 'शिवप्रतिष्ठान'कडून कॅफेची तोडफोड

Latest Marathi News Live Update : गिरीश महाजन छगन भुजबळ यांच्या भेटीला भुजबळ फॉर्मवर दाखल

SCROLL FOR NEXT