Latest WhatsApp update brings a new feature
Latest WhatsApp update brings a new feature 
देश

व्हाट्सअप झालंय अपडेट; आणलंय नवीन फीचर

सकाळन्यूजनेटवर्क

पुणे : सध्याच्या घडीला सोशल माध्यमात आघाडीवर असणाऱ्या व्हाट्सऍप मध्ये नवनवे फीचर्स अपडेट होत असतात. व्हाट्सऍप नेहमीच आपल्या वापरकर्त्यांसाठी   युजरफ्रेंडली करण्याकरिता सतत नवनवीन अपडेट अमलात आणत असते. सध्या व्हाट्सऍप मध्ये आणखीन एक नवीन फीचर आणले जात आहे. यामध्ये आपल्याला नवीन कॉन्टॅक्ट ऍड करण्यासाठी नंबर टाईप किंवा सेव्ह करण्याची गरज लागणार नाही. यासाठी फक्त एक क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

जगभरात अनेकजण इन्स्टंट मेसेजिंगसाठी व्हाट्सऍपचा वापर करत असतात. एकट्या भारतातच २०  कोटींपेक्षा अधिक लोक व्हाट्सऍपचे वापरकर्ते आहेत. त्यामुळे व्हाट्सऍपला अजूनही युजरफ्रेंडली बनविण्यासाठी नवीन फीचर्स जोडले जातात.  व्हाट्सऍपने आता एक नवीन फीचर आणले असून या मध्ये इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅट प्रमाणे एखादा नवीन कॉन्टॅक्ट ऍड करण्यासाठी नंबर टाईप किंवा सेव्ह करण्याची गरज लागणार नाही, तर क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर आपोआप नवीन कॉन्टॅक्ट ऍड होणार आहे. यानुसार व्हाट्सऍपमधील सर्व कॉन्टॅक्ट नंबर क्यूआर कोड मध्ये दिसणार असून, नवीन कॉन्टॅक्ट ऍड करायचे झाल्यास फक्त क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार.
----------
हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषधाचा वापर कोणासाठी?
---------
हिंमतवान ज्योतीला ट्रम्प कन्येचा सलाम
---------

व्हाट्सऍपने हे नवे फीचर आपल्या नव्या अँड्रोइड आणि आयओएस बीटा व्हर्जन मध्ये देण्यास सुरुवात केली असून, लवकरच हे नवे फीचर स्टँडर्ड व्हर्जन मध्ये देखील दाखल होणार आहे. व्हाट्सऍपचे हे नवे फीचर सेटिंग मेनू मध्ये देण्यात आले आहे. सेटिंग मधील प्रोफाइलच्या शेजारी क्यूआर कोड आयकॉन दिलेला असेल, यावर किल्क केल्यानंतर आपला क्यूआर कोड दिसेल. शिवाय याच्या शेजारीच क्यूआर कोड स्कॅन करण्यासाठी ऑप्शन देण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 06 मे 2024

Women’s T20 World Cup: स्कॉटलँडने रचला इतिहास, वर्ल्ड कपचं पहिल्यांदाच मिळवलं तिकीट; श्रीलंकाही ठरले पात्र

Sharad Pawar : बारामतीकरांना धक्का अशक्य;निवडणुकीची अमेरिकेतही उत्सुकता

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

SCROLL FOR NEXT