madgaon.jpg
madgaon.jpg 
देश

लाॅरेन्स यांनी घेतली सरदेसाईंची भेट

सकाळ वृत्तसेवा

मडगाव ः काॅंग्रेसचे कुडतरीचे आमदार रेजिनाल्ड लाॅरेन्स यांनी आज दुपारी उपमुख्यमंत्री आणि गोवा फाॅरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांची त्यांच्या दवंडे-फातोर्डा येथील निवासस्थानी भेट घेतली. 

रेजिनाल्ड हे सरदेसाई यांचे पूर्वीश्रमीचे मित्र असून सरदेसाई यांचा पक्ष भाजपप्रणित सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांच्या राजकीय वाटा वेगळ्या झाल्या होत्या. अधूनमधून त्यांच्यात शाब्दीक चकमकीही झडल्या होत्या. काॅंग्रेसच्या दहा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने बदललेल्या राजकीय स्थितीच्या पार्श्वभूमीवर रेजिनाल्ड यांनी सरदेसाई यांची घेतलेली ही भेट त्यामुळे भुवया उंचावणारी ठरली. 

ही सहज अशी भेट होती. सरदेसाई हे सरकारमध्ये होते. ते आता सरकारमध्ये आहेत की नाहीत ते लवकरच स्पष्ट होणार आहे. सत्तेत असताना सर्वचजण तुमची भेट घेतात. पण, सत्तेत नसताना भेट घेण्यास वेगळे महत्व असते, असे रेजिनाल्ड यांनी पत्रकारांना सांगितले.

सरदेसाई यांच्यासह गोवा फाॅरवर्ड पक्षाचे तिघे आमदार भाजपप्रणित युती सरकारमध्ये मंत्री आहेत. सरदेसाई हे उपमुख्यमंत्री आहेत. तथापि, काॅंग्रेस आमदारांच्या प्रवेशामुळे भाजपचे विधानसभेतील संख्याबळ सत्तावीस ( विधानसभेचे एकूण संख्याबळ चाळीस) झाले आहे. नवीन राजकीय घडामोडीनंतर मंत्रिमंडळ फेरबदलाचे संकेत मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी दिले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT