Amit Shah esakal
देश

Amit Shah : कायदा-सुव्यवस्थेची स्थिती गंभीर; शहा यांची मुख्यमंत्री मान यांच्यावर टीका

शहा म्हणाले, ‘‘पोकळ आश्‍वासने देणारे ‘आप’सारखे दुसरे सरकार आयुष्यात बघितलेले नाही

सकाळ वृत्तसेवा

गुरुदासपूर : ‘‘पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे अरविंद केजरीवाल यांच्यासोबत देशभरात फिरण्यात वेळ वाया घालवत असल्याने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती गंभीर होत आहे,’’ अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केली.

मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शहा यांची आज येथे सभा झाली. त्यात बोलताना शहा म्हणाले, ‘‘पोकळ आश्‍वासने देणारे ‘आप’सारखे दुसरे सरकार आयुष्यात बघितलेले नाही.’’

मान सरकारवर टीका करताना ते म्हणाले, ‘‘पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे एक काम आहे. केजरीवाल यांना चेन्नईला जायचे असेल तर ते आधी विमानाने दिल्लीला जातात आणि नंतर ते विमान घेऊन चेन्नईला जातात. जर केजरीवाल यांना कोलकत्याला जायचे असेल, तर ते विमान कोलकत्याला घेऊन जातात. कधी कधी असे वाटते की मान हे मुख्यमंत्री आहेत का वैमानिक?’’

‘‘केजरीवाल यांना देशव्यापी पर्यटनाला घेऊन जाण्याचे काम पंजाबचे मुख्यमंत्री मान करत आहेत. त्यांचा सगळा वेळ केजरीवाल यांना सांभाळण्यात जात आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्यातील कायदा व सुव्यवस्था गंभीर होत आहे. राज्यातील जनता सुरक्षित नाहीये,’’ असे शहा म्हणाले.

‘‘अमली पदार्थांचा छुपा व्यापार वाढत आहे. मुख्यमंत्र्यांना त्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडेही त्यांचे लक्ष नाही. राज्यातील प्रत्येक महिलेला प्रत्येकी एक हजार रुपये देण्याचे आश्‍वासन ‘आप’ सरकारने दिले होते. प्रत्यक्षात महिलांना एक हजार पैसेही त्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत,’’ अशी टीकाही शहा यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT