nitish kumar_tejswi yadav 
देश

"झालं गेलं विसरुन जा"; नव्या सरकारसाठी नितीश कुमारांची तेजस्वी यादवांना साद

नितीश कुमार आणि तेजस्वी यादव राजभवनावर जाऊन राज्यपालांची घेणार भेट

सकाळ डिजिटल टीम

पाटणा : मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत नितीश कुमार यांनी भाजप आणि एनडीएची साथ सोडली. त्यानंतर आता राष्ट्रीय जनता दलासोबत नवं सरकार स्थापन करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. यासाठी राजदच्या नेत्या राबडी देवी यांच्यासह त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांची त्यांनी भेट घेतली. तसेच झालं गेलं विसरुन जा आणि नव्या अध्यायासाठी तयार रहा, अशा शब्दांत नितीश कुमार यांनी त्यांना साद घातली.

"आता सन २०१७ मध्ये काय झालं ते विसरुन जा आपण आता नवा अध्याय सुरु करुयात," अशा शब्दांत नितीश कुमार यांनी राजद नेते तेजस्वी यादव यांना साद घालण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती राजदच्या सुत्रांकडून मिळते. याला तेजस्वी यादव यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला असून ते राजभवनाकडे रवाना झाले आहेत.

बिहारमध्ये निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगात वेगाने घडामोडी घडत असून नितीश कुमार हे राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत. राजभवनावर नितीशकुमार आणि तेजस्वी यादव यांची भेट होऊन ते सत्तास्थापनेचा दावा करु शकतात.

दरम्यान, आपल्या आमदार आणि खासदारांशी चर्चा केल्यानंतर एनडीएतून बाहेर पडण्यावर सर्वांचं एकमत झाल्यानंतर नितीशकुमार यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यामुळं जेडीयू अधिकृतरित्या भाजप आणि एनडीएतून बाहेर पडल्याचं स्पष्ट झालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tourist Rescue Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये थरार! हवेत लटकलेल्या केबिनमध्ये 400 अडकले पर्यटक, केबल कार बिघाडानंतर रात्रभर बचावकार्य

Chhatrapati Sambhajinagar: शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल देण्यासंदर्भात पुरवठा विभागाचे महत्त्वाचे आदेश

Pune District: डिझेलच्या तुटवड्याने शेतकरी हैराण; बहुतांश पंपांवर वाहनांच्या रांगा; मर्यादित प्रमाणात वाटप

Chhatrapati Sambhajinagar: शिंदे सेनेच्या नेत्यावर हल्ला; हिंमत असेल तर भेटायला ये म्हणाला, भेटताच मजाक केला म्हणत गळाभेट घेऊन चाकूने भोसकलं

Video: 'मला तुमची कीव येते...', श्रेयस अय्यरच्या बहिणीने त्या Video वरून तिच्यावर झालेल्या ट्रोलिंगला दिलं सडेतोड उत्तर

SCROLL FOR NEXT