Lightning Strike Kills 38 people in 24 hours in Uttar Pradesh rain marathi news  
देश

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशात ‘वीजे’चा कहर! चोवीस तासांत ३८ जणांचा मृत्यू; दहा ते बारा जण जखमी

Lightning Strike Kills 38 people : काल सायंकाळी चार ते सहा या काळात प्रचंड पाऊस झाला आणि वीज कोसळण्याच्या घटना घडल्या.

सकाळ वृत्तसेवा

लखनौ/प्रतापगड, ता. ११ : उत्तर प्रदेशात गेल्या चोवीस तासांत वीज पडून झालेल्या विविध दुर्घटनेत ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. यात प्रतापगड येथे सर्वाधिक ११, सुलतानपूर येथे सात, चंदौली येथे सहा, मैनपुरी येथे पाच, प्रयागराज येथे चार, ओररिया, हाथरस, वाराणसी आणि सिद्धार्थनगर येथे प्रत्येकी एका जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच दहा ते बारा जण जखमी झाले आहेत.

उत्तर प्रदेशात बुधवारी वीज कोसळून झालेल्या घटनांत किमान ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या उत्तर प्रदेशातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती असून जनजीवन ठप्प झाले आहे. प्रतापगड जिल्ह्यात विविध ठिकाणी वीज पडल्याने अकरा जणांचा मृत्यू झाला. तसेच चंदोली येथे वीज कोसळल्याने अनेक जण जखमी देखील झाले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

काल सायंकाळी चार ते सहा या काळात प्रचंड पाऊस झाला आणि वीज कोसळण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे अनेक जण जखमी झाले. यादरम्यान दोन चुलत भाऊ शेतात काम करत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यात दोघांचाही मृत्यू झाला. सुलतानपूर येथील सात मृतांत तीन मुलांचा समावेश आहे. वीज कोसळल्याच्या घटना घडल्या तेव्हा काही जण धानाची लागवड करत होते तर काही जण आंबे तोडत होते.

एक महिला पावसामुळे झाडाखाली उभी असता तिच्या अंगावर वीज पडली. तिचा जागेवरच मृत्यू झाला. ओररिया येथे पावसामुळे आंब्याच्या झाडाखाली थांबलेल्या एका चौदा वर्षाच्या मुलाचा वीजेमुळे मृत्यू झाला. देवरिया येथे शेतात जाणाऱ्या पाच वर्षाच्या मुलाचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला. वाराणसीत दोन भावांवर वीज कोसळली. एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत. भारतीय हवामान खात्याने येत्या पाच दिवसांत उत्तर प्रदेश आणि अन्य लगतच्या राज्यांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata News: चंद्रशेखरन यांचा U-Turn? पुन्हा Tata चेअरमनपदी निवड! निर्णय होताच शेअर्स 5% वाढले; नेमकं काय घडलं?

UPI MDR 2026 : अमेरिकेच्या दबावामुळे युपीआय वर एमडीआर? केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण; जाणून घ्या नेमकं प्रकरण

Asian Games 2026 Cricket : पाकिस्तानला दुबळ्या थायलंडने रडवले, शेजारी २ चेंडू राखून कसेबसे जिंकले; चीन न खेळताच स्पर्धेबाहेर

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या टीमवर दुःखाचा डोंगर; लेखकाचं अकस्मात निधन, सचिन गोस्वामींची भावुक श्रद्धांजली

Latest Marathi News Update : आम्ही ECI च्या विवेकाधिकाराची जागा घेऊ शकत नाही - सुप्रीम कोर्टाचं महत्वाचं निरीक्षण

SCROLL FOR NEXT