देश

काश्‍मीरमध्ये वाहनांना पेट्रोलचा मर्यादित पुरवठा;हिमवृष्टीच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाचा आदेश 

जावेद मात्झी - सकाळ न्यूज नेटवर्क

श्रीनगर - जम्मू-काश्‍मीरमध्ये मंगळवारी तुफान हिमवर्षाव होत असून अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने सलग तिसऱ्या दिवशी जम्मू-काश्‍मीर राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवला होता. विभागीय प्रशासनाने संबंधित विभागांसाठी नियमावली जाहीर केली असून ग्राहकांना मर्यादित स्वरूपात पेट्रोल देण्याचे निर्देश पेट्रोलपंप चालकांना दिले आहेत. 

ग्राहकांना २१ दिवसांनंतरच आणि लेखी पावती व नोंदींसह गॅस सिलिंडर देण्याची सूचना काश्‍मीरचे विभागीय आयुक्त पी.के. पोळे यांनी एलपीजी गॅस पुरवठा कंपन्यांना दिली आहे. आदेशानुसार दुचाकींसाठी तीन लिटर, तीनचाकी वाहनांसाठी पाच लिटर, खासगी चारचाकी गाड्यांसाठी दहा लिटर तर बस व ट्रकसह व्यावसायिक वाहनांना २० लिटर पेट्रोल किंवा डिझेलची देण्यात येणार आहे. आदेशाचे पालन होते की नाही, याची तपासणी करण्यासाठी संबंधित तहसीलदार आणि अन्य अधिकाऱ्यांनी अचानक भेट द्यावी व उपायुक्तांना अहवाल द्यावा, असेही सांगण्यात आले आहे. 

हिमवर्षाव व दरडी कोसळल्याने जम्मू-काश्‍मीर राष्ट्रीय महामार्ग आजही बंद ठेवला होता. यामुळे २५० वाहने अडकली होती. त्यात प्रवासी वाहनांची संख्या जास्त होती. बनिहाल आणि काझिगुंड दरम्‍यान मुख्य रस्त्यांवरील बर्फ हटविल्यानंतर एकेरी वाहतूक काही अंशी सुरू करण्यात आली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. वाहनांमध्ये अडकलेल्या अनेक प्रवाशांमध्ये तीनजण कर्करुग्ण होते. या सर्वांची राहण्याची व खाण्याची सोय तथार-नौगाममधील ग्रामस्थांनी केली होती. 

जम्मूत मुसळधार पाऊस 
काश्‍मीर खोऱ्यात हिमवृष्टी होत असताना जम्मू व अन्य पठारी भागात आज मुसळधार पाऊस पडला. या भागातील उंचावरील प्रदेशात सलग तिसऱ्या दिवशी बर्फवृष्टीचा सामना करावा लागला. गेल्या २४ तासात जम्मूत ३२.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, असे हवामान विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले. जम्मूत किमान तापमान ११. ९ अंश सेल्सिअस होते. दोडा जिल्हा, बनिहाल आणि बाटोट येथे अनुक्रमे ४ सेंटीमीटर, ३.२ आणि ०.५ सेंटीमीटर हिमवृष्टी झाली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Dashavatar: दशावतार चित्रपटात दाखवलेला तो 'राखणदार' कोकणात खरंच असतो का? काय आहे परंपरा?

Crime News : सिन्नरमधील वायर चोरी प्रकरणी दोघांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Updates : करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन उद्या दिवसभर बंद राहणार

SCROLL FOR NEXT