Liquor Sale Sakal
देश

Liquor Sale: एका वर्षात 350 कोटी लिटर दारु संपवली! कोणतं राज्य आघाडीवर?

गेल्या काही वर्षांपासून भारतात मद्यविक्रीचा खप सातत्याने वाढत आहे.

राहुल शेळके

Liquor Sale: गेल्या काही वर्षांपासून भारतात मद्यविक्रीचा खप सातत्याने वाढत आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारतातील जनतेने या बाबतीत एक नवा विक्रम केला आहे.

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन अल्कोहोलिक बेव्हरेज कंपनीज (CIABC) या अल्कोहोल उद्योगाच्या संघटनेने नुकत्याच दिलेल्या अहवालात ही आकडेवारी समोर आली आहे.

CIABC डेटानुसार, 2022-23 या आर्थिक वर्षात, भारतात बनवलेल्या विदेशी मद्याची म्हणजेच IMFL ची विक्री 14 टक्क्यांनी वाढून 38.5 कोटी बॉक्सवर पोहोचली आहे.

एका बॉक्समध्ये 9 लिटर दारू असते. अशाप्रकारे गेल्या आर्थिक वर्षात भारतीयांनी सुमारे 350 कोटी लिटर दारू खरेदी केली. एका आर्थिक वर्षातील ही आतापर्यंतची सर्वाधिक विक्री आहे. हा आकडा कोराेना पूर्वी म्हणजेच आर्थिक वर्ष 2019-20 च्या तुलनेत सुमारे 12 टक्के अधिक आहे.

महागड्या दारूच्या विक्रीमध्ये वाढ

CIABC च्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, गेल्या आर्थिक वर्षात सर्वाधिक विक्री प्रीमियम श्रेणीत झाली आहे. 1000 रुपये प्रति 750 मिली पेक्षा जास्त किंमतीचे मद्य या श्रेणीत ठेवले आहे.

आकडेवारीनुसार, गेल्या आर्थिक वर्षात या प्रीमियम विभागातील मद्यविक्रीत 48 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, 500-1000 रुपये प्रति 750 मिली पेक्षा कमी श्रेणीचा हिस्सा 20 टक्क्यांवर आला आहे.

आकडेवारीनुसार स्वस्त दारू अजूनही प्रथम क्रमांकावर आहे. व्हॉल्यूमच्या बाबतीत, एकूण विक्रीत त्याचा वाटा सुमारे 79 टक्के आहे.

यंदा विक्री एवढी होऊ शकते

मद्यविक्रीतील तेजीचा हा कल चालू आर्थिक वर्षातही कायम राहील, असा विश्वास CIABC ला आहे. CIABC चालू आर्थिक वर्षात मद्यविक्रीत आठ टक्के वाढ अपेक्षित आहे.

अशा प्रकारे, 2023-24 मध्ये दारूची एकूण विक्री सुमारे 42 कोटी बॉक्सवर पोहोचू शकते. याचा अर्थ 2023-24 मध्ये सुमारे 380 कोटी लिटर दारू विकली जाऊ शकते.

या मद्याची सर्वाधिक विक्री होत आहे. या अहवालात व्हिस्की हे भारतात सर्वाधिक विकले जाणारे मद्य असल्याचे म्हटले आहे. दारूच्या एकूण विक्रीत त्याचा 63 टक्के वाटा आहे.

राज्यांचे दारू विक्रीतील प्रमाण:

गेल्या आर्थिक वर्षात, पश्चिमेकडील राज्यांमध्ये सर्वाधिक 32 टक्के विक्री वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, पूर्वेकडील राज्यांमध्ये 22 टक्के, उत्तरेकडील राज्यांमध्ये 16 टक्के आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये 9 टक्के वाढ नोंदवण्यात आली.

मात्र, एकूण विक्रीत दक्षिणेकडील राज्यांचा वाटा अजूनही सर्वाधिक आहे. ते सध्या एकूण विक्रीत 58 टक्के प्रमाण आहेत. त्याच वेळी, पश्चिम आणि पूर्व विभागांचे प्रमाण 22-22 टक्के आहे.

तर उत्तरेकडील राज्यांचे प्रमाण16 टक्के आहे. गेल्या आर्थिक वर्षात विक्रीत 54 टक्के वाढ नोंदवून पंजाब राज्य आघाडीवर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

Pune Hospital Row: टीकेच्या झंझावातात भिमाले माघारी; बाणेर कर्करोग रुग्णालयावरील वडिलांचे नावाचा फलक हटवला

Devgad Hapus AI : देवगड हापूस गुणवत्तेसाठी AI स्कॅनिंग मशीनला अनुदान द्यावे; राहुल शेवाळे यांची केंद्रीय कृषिमंत्र्याकडे मागणी

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना

SCROLL FOR NEXT