Lizard
Lizard  Sakal
देश

McDच्या कोकमध्ये आढळली पाल; तक्रार केल्यावर मॅनेजर हसला, रेस्टॉरंट सील

दत्ता लवांडे

अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद येथे असलेल्या Mcdonald's रेस्टॉरंटमध्ये एका ग्राहकाने ऑर्डर केलेल्या कोल्ड्रिंकमध्ये पाल आढळली आहे. त्या ग्राहकाने त्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल केला आहे. त्यानंतर त्यानंतर अन्न व आरोग्य विभागाने कारवाई करत रेस्टॉरंट बंद केले आहे.

(Lizard Found In Coke Restaurant Seal)

भार्गव जोशी असं या ग्राहकाचं नाव असून त्याने ANI ला बोलताना सांगितलं की, "मी आणि माझा मित्र रेस्टॉरंटमध्ये गेलो असताना दोन बर्गर आणि दोन कोल्ड्रिंक खरेदी केले होते. आम्ही कोल्ड्रिंक स्ट्रॉ ने हलवल्यावर त्यात आम्हाला मृत पाल आढळली." त्यानंतर आम्ही ही गोष्ट मॅनेजरला सांगितली तेव्हा तो हे पाहून हसू लागला आणि म्हणाला की,"असं कधी कधी होत असतं." असं म्हणत तो हसत होता.

त्यानंतर तो सीसीटीव्ही कॅमेरे चेक करतो म्हणून निघून गेला आणि परत आला नाही. त्यानंतर आम्ही त्याच्याकडे गेलो तेव्हा त्याने फक्त तुमच्या बिलाचे पैसे परत देण्यात येतील असं सांगितल्याचं भार्गव जोशी याने सांगितलं.

त्यानंतर त्याने या घटनेचा व्हिडीओ काढून व्हायरल केला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अन्न व औषध विभागाने या रेस्टॉरंटवर कारवाई केली आहे. प्रशासनाकडून कोल्ड्रिंकचे नमुने तपासण्यासाठी पाठवण्यात आले असून रेस्टॉरंट सील करण्यात आलं आहे.

या घटनेनंतर मॅक्डोनल्डने परिपत्रक जारी केलं असून त्यामध्ये त्यांनी "आम्ही अन्न सुरक्षा आणि स्वच्छताच्या बाबतीत सतर्क आहोत. गोल्डन ग्यारंटी कार्यक्रमांतर्गत आम्ही आमच्या सर्व आईटलेटमध्ये सुरक्षा आणि स्वच्छताचे नियम लागू केले आहेत. त्याचबरोबर घडलेल्या घटनेची चौकशी चालू आहे." असं रेस्टॉरंटकडून सांगण्यात आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: PM मोदी अन् फडणवीसांमुळे डेव्हिड हेडलीचे स्टेटमेंट घेऊ शकलो, उज्ज्वल निकमांचा खुलासा

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Fact Check: धर्मांतर करा असे सांगणारा कन्हैय्या कुमार यांचा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल; वाचा काय आहे सत्य

Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात नऊ उमेदवारी अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT