lockdown 3 people kill 12 feet cobra for meat at arunachal pradesh 
देश

घरातला तांदूळ संपला म्हणून खाल्ला 12 फूटांचा किंग कोब्रा...

वृत्तसंस्था

इटानगर (अरुणाचलप्रदेश) : जगाला कोरोना व्हायरसने विळखा घालायला सुरवात केल्यानंतर भारतामध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊनमुळे अनेकांचे हाल होताना दिसत आहेत. मात्र, येथील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तिघांनी 12 फूट लांबीच्या किंब कोब्राची शिकार केली आहे. किंग कोब्राला मारून तिघेजण खांद्यावरून नेताना दिसत आहेत. लॉकडाऊनमुळे घरातील तांदूळ संपल्यामुळे किंब कोब्राची शिकार केल्याचे एकजण सांगत आहे. शिवाय, जेवणाची तयारी केलेली दिसत असून, मांस स्वच्छ करण्यासाठी तसंच त्याचे तुकडे करण्यासाठी केळाची पानेही आणली होती.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'जंगली प्राण्याची शिकार केल्याबद्दल तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. किंग कोब्रा हा एक संरक्षित वन्यजीव आहे. त्याला मारणे गुन्हा आहे. अशा प्रकरणात जामीनही मिळत नाही. सध्या तिघेही फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.'

अरुणाचल प्रदेशात दुर्मीळ आणि लुप्त होत असलेल्या प्राण्यांची संख्या जास्त आहे. या ठिकाणी नुकताच एका विषारी सापाच्या नव्या प्रजातीचा संशोधकांनी शोध लावला होता. त्याचे नाव जे के रोलिंग यांच्या काल्पनिक चरित्रावरून सालाजार स्लाइथरीन च्या नावावरून ठेवण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात फक्त एक महिना पुरेल इतकाच इंधनसाठा...छगन भुजबळ यांच्या विधानानं खळबळ, नेमकं कायम म्हणाले?

CBI Strict Action NEET : नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा वाघमारे आणि मनीषा मांढरे समोरासमोर बसून होणार चौकशी, सीबीआय कडक पाऊल उचलणार

Mohammed Shami न खेळण्यामागचं कारण? इयान बिशप यांच्या प्रश्नावर रिषभ पंत गांगरला... त्याच्या हावभावामुळे काहीतरी बिनसल्याचं संशय

Nagzari River Drowning : नागझरीच्या नदीत बुडून तिघांचा मृत्यू, दोन बालकांसह तरुणाचा समावेश, खेड तालुक्यातील घटना

Who Is Gurnoor Brar? मोहम्मद शमीपेक्षा ६.५ फुटाच्या गोलंदाजाची कसोटी व वन डे संघात निवड करावी वाटली! हा खेळाडू आहे तरी कोण?

SCROLL FOR NEXT