Lok sabha Election 2024 esakal
देश

Lok sabha Election 2024 : EVM मशिनमध्ये कोणतीही छेडछाड तर झाली नाही ना? हे मतमोजणीपूर्वी कसे तपासले जाते? घ्या जाणून

Lok sabha Election 2024 : देशभरात नुकत्याच ७ टप्प्यांमधील निवडणुका पार पडल्यानंतर, आज जनतेच्या नजरा निवडणुकीच्या निकालांकडे लागल्या आहेत.

Monika Lonkar –Kumbhar

Lok sabha Election 2024 : देशभरात नुकत्याच ७ टप्प्यांमधील निवडणुका पार पडल्यानंतर, आज देशभरातील जनतेच्या नजरा निवडणुकीच्या निकालांकडे लागल्या आहेत. देशातील १८ व्या लोकसभेसाठी आज सकाळी ठीक ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे.

इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (ईव्हीएम) च्या मदतीने मतमोजणीची प्रक्रिया सुलभ आणि जलद झाली आहे. परंतु, निवडणुकीच्या वेळी ईव्हीएमच्या सुरक्षेबाबतही काही नेत्यांकडून प्रश्न उपस्थित केले जातात. त्यामुळे, अशा परिस्थितीमध्ये मतमोजणीपूर्वी ईव्हीएममध्ये छेडछाड झाली नाही, याची खात्री कशी होते? किंवा ती कशी केली जाते? याबद्दल जाणून घेऊयात.

ईव्हीएम मशिनची मतमोजणी कशी करतात?

१९५१ च्या लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ६४ नुसार, मतांची मोजणी संबंधित मतदारसंघाच्या रिटर्निंग ऑफिसर (RO) यांच्या देखरेखीखाली किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते.

ही मतमोजणी एका मोठ्या हॉलमध्ये केली जाते. या हॉलमध्ये वेगवेगळे टेबल ठेवले जातात. तसेच, या ठिकाणी ईव्हीएम मशिन जिल्हा मुख्यालय किंवा आरओ मुख्यालयात बांधलेल्या स्ट्रॉंग रूममधून आणल्या जातात आणि या टेबलावर ठेवल्या जातात. त्यानंतर, मतमोजणी करायला सुरूवात केली जाते.

ईव्हीएम मशिनची सुरक्षा कशी सुनिश्चित केली जाते?

EVM मशिनमध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड केली जाणार नाही, याची खात्री करण्यासाठी या मशिनची अनेक स्तरांवर तपासणी आणि सुरक्षितता केली जाते. ही ईव्हीएम मशिनची तपासणी सर्वात आधी BEL/ECIL अभियंत्यांच्या मार्फत केली जाते.

BEL/ECIL अभियंते राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर प्रत्येक EVM मशिनची तांत्रिक आणि भौतिक तपासणी करतात. त्यासाठी काही मशिनमध्ये मॉक पोल केले जातात. या कालावधीमध्ये कोणतेही यंत्र सदोष आढळल्यास ते पुन्हा कारखान्याकडे पाठवले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैताग आलाय, लोक विचारतायत, बायको विचारतेय...; भाजपच्या निष्ठावंताला अश्रू अनावर, उमेदवारी नाकारल्यास आत्मदहनाचा इशारा

Latest Marathi News Live Update : अकोल्यात नगरसेवक पदाचा अर्ज भरताना उमेदवारानं आणली 5 हजार रुपयांची चिल्लर

Virat Kohli नवीन वर्षातही खेळणार विजय हजारे ट्रॉफीतील सामना, पण कधी आणि कोणाविरुद्ध? जाणून घ्या

Bus Accident : भीषण अपघातात बसमधील पाच प्रवासी जळून खाक; ओळख पटवणं झालं होतं मुश्किल, दोघांचं ठरलेलं लग्न अन् काळाचा...

BMC Election: निवडणुकीसाठी महापालिका सज्ज, ५० हजार कर्मचाऱ्यांचे महाप्रशिक्षण सुरू

SCROLL FOR NEXT