Lok Sabha Election 2024 PM Modi avoided campaigning in Raebareli and Amethi Congress BJP Politics news  
देश

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींनी रायबरेली, अमेठीत प्रचार करणे टाळले, नेमकं कारण काय?

Lok Sabha Election 2024 : रायबरेली व अमेठी या दोन्ही मतदारसंघांमध्ये येत्या सोमवारी मतदान होणार असून प्रचार आज सायंकाळी संपला.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशातील रायबरेली आणि अमेठी या लक्षवेधी मतदारसंघात यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभा घेतल्या नाहीत. गृहमंत्री अमित शहा यांनी या दोन्ही मतदारसंघात रोड शो व सभा घेतल्या.

रायबरेली व अमेठी या दोन्ही मतदारसंघांमध्ये येत्या सोमवारी मतदान होणार असून प्रचार आज सायंकाळी संपला. परंतु या प्रचाराच्या दोन आठवड्यात पंतप्रधानांनी या दोन्ही मतदारसंघात प्रचार सभा किंवा रोड शो केले नाही. भाजपचे स्टारप्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सर्वाधिक प्रचारसभा व रोड शो केले आहेत.

गांधी कुटुंबाचे मतदारसंघ राहिलेल्या रायबरेली व अमेठीमध्ये मात्र त्यांनी यावेळी जाणे टाळले. यावेळी रायबरेलीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी मैदानात आहेत तर अमेठीत गांधी कुटुंबाचे विश्वासू किशोरीलाल शर्मा लढत देत आहेत.

या दोन्ही मतदारसंघातील प्रचाराची धुरा काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी सांभाळली आहे. गेल्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी अमेठीत प्रचार केला होता. स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पराभव केला होता. परंतु यावेळी दोन्ही लक्षवेधी मतदारसंघात प्रचाराला ते आले नाहीत. या दोन्ही मतदारसंघातील प्रचाराची जबाबदारी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सोपविली होती. दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी रायबरेलीत जाऊन राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. या दोन्ही मतदारसंघात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक मंत्र्यांनी डेरा टाकला आहे. परंतु पंतप्रधान मोदी यांनी या मतदारसंघात प्रचारासाठी येणे टाळले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

Kolhapur Crime : शेतात कामासाठी गेलेल्या महिलेवर अतिप्रसंग, शरीरसुखास नकार दिल्याने निर्घृण खून; खिशावरील 'त्या' डागाने उलगडलं धक्कादायक रहस्य

Pune News : पुणे शहरात सिमेंट काँक्रिट उखडले; रस्त्यावर पुन्हा खड्डे

SCROLL FOR NEXT