Rahul Gandhi 
देश

Lok Sabha Election Result : विरोधात बसणार की सत्ता स्थापन करणार? निकालानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

Rahul Gandhi On Lok Sabha Elections Results 2024 : लोकसभा निवडणूक २०२४ चे निकाल जाहीर झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली आहे.

रोहित कणसे

Lok Sabha Elections Results 2024 : लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहेत. या निवडणुकीत आतापर्यंत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला २९४ जागांवर आघाडी मिळाली असून इंडिया आघाडीचे २३१ जागांवर आणि १८ जागांवर इतर पक्षांचे उमेदवार आघाडीवर आहेत. यादरम्यान निकालाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची पुढील भूमिका जाहीर केली. यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सत्ता स्थापनेच्या शक्यतेवर देखील भाष्य केलं.

एनडीएला बहुमत मिळताना दिसत आहे, पण एनडीएमधील टीडीपी आणि जेडीयू यापुर्वी तुमच्यासोबतही राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर तुम्ही विरोधात बसण्याचा निर्णय घेतला आहे की, अजूनही सत्ता स्थापनेची शक्यता आहे? असा प्रश्न राहुल गांधी यांना विचारण्यात आला. यावेळी उत्तर देताना राहुल गांधी यांनी सांगितले की, आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे आम्ही आमच्या इंडिया आघाडीमधील सहकाऱ्यासोबत बैठक घेणार आहोत. ही बैठक उद्या होईल आणि या प्रश्नाचे उत्तर त्या बैठकीत दिले जाईल. आम्ही आमच्या घटक पक्षांचा आदर करतो, त्यामुळे त्यांची मते घेतल्याशिवाय आम्ही कोणतीही घोषणा करणार नाही असेही राहुल गांधी म्हणाले. पुढील निर्णय उद्या इंडिया आघाडीची बैठकीत होईल असेही राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.

पुढे बोलताना राहुल गांधी यांनी आम्ही एका आघाडीचा भाग आहोत, इतर पक्षांसोबत आमची चर्चा झालेली नाहीये. निकालानंतर पाच तारखेला आमची बैठक होईल असं ठरलं आहे. त्या बैठकीत आम्ही विरोधात बसणार की सत्तास्थापनेचा प्रयत्न करणार हे ठरवू असे पुन्हा राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं.

ही निवडणुक इंडिया आघाडी आणि काँग्रेस पक्ष यांनी फक्त एका पक्षाविरोधात लढली नव्हती , ही निवडणूक आम्ही भाजप- एक राजकीय पक्ष, भारताचे इंस्टीट्यूशन्स, सीबीआय, ईडी, न्यायव्यवस्था यांच्याविरोधात लढलो होतो. कारण या सर्वांना नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी ताब्यात घेतलं, धमकावलं होतं. ही लढाई संविधान वाचवण्याची होती. यांनी बँक खाती गोठवली, मुख्यमंत्र्यांना जेल मध्ये टाकले, तेव्हा माझ्या मनात होतं की जनता आपल्या संविधानासाठी लढेल आणि हे खरं ठरलं. मी भारतातील जनतेचे, इंडिया आघाडीतील सर्व पक्षाचे आभार मानतो. तुम्ही संविधान वाचवण्यासाठी पहिलं पाऊल उचललं आहे असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत मोठा अनर्थ टळला! मोटरमनच्या क्षणभराच्या चुकेने प्रवाशांचा थरकाप, भांडूप स्थानक आलं तरी लोकल थांबली नाही, काय घडलं?

Gudipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत सत्ता समीकरणात मोठी उलथापालथ, भाजप अध्यक्षपदाच्या दिशेने

पुण्याची बातच न्यारी! मृणाल ठाकूरने पुण्यात येताच केली 'ही' गोष्ट, खास मराठी पोस्ट करत म्हणाली... 'पुण्यात आलो आणि...'

Indore Fire Accident : इमारतीला भीषण आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू; इलेक्ट्रिक कार चार्जिंग करताना शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना

SCROLL FOR NEXT