Lok Sabha Election 2024 
देश

Lok Sabha Election 2024 : सहाव्या टप्प्यातीलप्रचार थंडावला! देशातील ५७ मतदारसंघांत शनिवारी मतदान

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील ५७ लोकसभा मतदारसंघांतील प्रचार आज संपला असून येत्या शनिवारी या मतदारसंघांमध्ये मतदान होईल

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली, ता. २३ ः लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील ५७ लोकसभा मतदारसंघांतील प्रचार आज संपला असून येत्या शनिवारी या मतदारसंघांमध्ये मतदान होईल. बिहार (८), हरियाना (१०), झारखंड (४), ओडिशा (६) उत्तरप्रदेश (१४), पश्चिम बंगाल (८) आणि दिल्लीतील सात मतदारसंघांचा यात समावेश आहे.

केंद्रीय मंत्री सुभाष सरकार, माजी न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय, भोजपुरी अभिनेता मनोज तिवारी, उत्तप्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगदंबिका पाल, ज्येष्ठ नेते भर्तुहरी महताब, युवा नेते कन्हैय्याकुमार, अभिनेता राज बब्बर, माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी, माजी केंद्रीय मंत्री कुमारी शैलजा यांच्यासह ८८९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होईल.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज दिल्लीत दोन रोड शो करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा विविध मतदारसंघांमध्ये रोड शो केले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईशान्य दिल्ली लोकसभा मतदारसंघात मनोज तिवारी यांच्यासाठी रोड शो केला.

मोदींनी खालची पातळी गाठली

मला तोडण्यासाठी माझ्या आई-वडिलांचा चौकशीच्या नावाखाली छळ करण्यात आल्याचा आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. पंतप्रधान मोदी यांनी बदला घेण्याची अत्यंत खालची पातळी गाठली असून माझ्याऐवजी आई-वडिलांची तपासणी करण्याचे दूरध्वनी दिल्ली पोलिसांना आले होते. माझ्या आई-वडिलांचे वय ८५ वर्षे आहेत. ते अनेक व्याधींनी ग्रस्त असताना देखील त्यांना पोलिस चौकशीसाठी ताटकळत ठेवणे हे कोणत्या माणुसकीत बसते? असा सवाल त्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT