West Bengal Exit Poll 2024 esakal
देश

West Bengal Exit Poll 2024 : ममतांच्या बंगालमध्ये भाजपचा डंका? महत्त्वाचे एक्झिट पोल काय सांगताएत?

पश्चिम बंगालमध्ये २०१९च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ४२ पैकी १८ जागांवर भाजपने विजय मिळवला होता. तर काँग्रेसला दोन जागा मिळाल्या होत्या. तृणमूल काँग्रेसने २२ जागा जिंकल्या होत्या. यावेळी भाजप आघाडी घेत असल्याचं कलांमधून दिसत आहे.

संतोष कानडे

Loksabha election 2024 : लोकसभा निवडणुकीचा सातवा टप्पा शनिवारी सहा वाजता संपन्न झाला. त्यानंतर आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपप्रणीत एनडीएला बहुमत मिळत असल्याचं दिसून येत आहे. साधारण साडेतीनशे जागांच्या पुढे एनडीए आणि इंडिया आघाडीला दीडशे जागांच्या आसपास जागा मिळतील, असा अंदाज आहे.

एकट्या पश्चिम बंगालचा विचार केल्यास तिथे भाजपचा डंका वाजत असल्याचं चित्र आहे. बंगालच्या ४२ लोकसभा जागांपैकी अनेक जागांवर सत्तारुढ तृणमूल काँग्रेसला धक्का बसणार असल्याचं चित्र आहे. मागच्या निवडणुकीमध्ये भाजपने १८ जागांवर विजय मिळवलेला होता.

सी वोटरच्या पोलमध्ये ममतांना धक्का

सी वोटरच्या एक्झिट पोलमध्ये बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला १३ ते १७ जागा मिळू शकतात. तर भाजपला २३ ते २७ जागा मिळू शकतात. त्याशिवाय काँग्रेसला १ ते ३ जागा मिळण्याची शक्यता आहे.

'जन की बात'चा भाजपकडे कल

जन की बात या संस्थेने भाजपला २१ ते २६ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. तर ममतांच्या तृणमूल काँग्रेसल १६ ते १८ जागा मिळण्याची शक्यता आहे.

रिपब्लिक भारतच्या पोलमध्येही भाजपच पुढे

रिपब्लिक भारत आणि मॅट्रिजच्या एक्झिट पोलमध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपला डंका वाजताना दिसतोय. पोलनुसार, भाजप बंगालमध्ये ४२ पैकी २१ ते २५ जागा जिंकू शकतात. तृणमूल काँगेसला १६ ते २० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर लेफ्ट आणि काँग्रेसला शून्य जागा दाखवण्यात आलेल्या आहेत.

२०१९ मध्ये काय परिस्थिती होती?

पश्चिम बंगालमध्ये २०१९च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ४२ पैकी १८ जागांवर भाजपने विजय मिळवला होता. तर काँग्रेसला दोन जागा मिळाल्या होत्या. तृणमूल काँग्रेसने २२ जागा जिंकल्या होत्या. यावेळी भाजप आघाडी घेत असल्याचं कलांमधून दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kondhwa Gun Firing : आयुष कोमकरच्या खुनाचा बदला? सहा गोळ्या झाडून कोंढव्यात गणेश काळेचा मर्डर

Jalgaon Politics : जळगाव शहरात 'ठाकरे' गटाला मोठा हादरा! माजी महापौर नितीन लढ्ढांसह १५ नगरसेवकांनी धरला भाजपचा हात

Latest Marathi News Live Update : जेद्दाहहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाईट ६ई ६८ ला सुरक्षेचा धोका

Crime News: नाक चाव्याची दहशत! उंदरासारख्या दातांनी अर्धा डझन लोकांची कुरतडली नाकं, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Railway News: प्रवाशांना दिलासा! ट्रेनमध्ये ट्रान्सजेंडर लोकांकडून त्रास होतो का? वाचण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सोपा मार्ग सांगितला

SCROLL FOR NEXT