Lok Sabha Election Esakal
देश

Lok Sabha Election: लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखेसंदर्भात पत्र व्हायरल, निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण

Lok Sabha Election: निवडणूक आयोगाच्या परिपत्रकावरून गोंधळ निर्माण झाला होता. लोकसभेसाठी येत्या १६ एप्रिलला मतदान होण्याची शक्यता असल्याबाबतचे दिल्ली निवडणूक आयोगाचे पत्र व्हायरल झाल्याने मतदानाच्या तारखेवरून चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली: लोकसभेसाठी येत्या १६ एप्रिलला मतदान होण्याची शक्यता असल्याबाबतचे दिल्ली निवडणूक आयोगाचे पत्र व्हायरल झाल्याने मतदानाच्या तारखेवरून चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ही तारीख निश्चित झालेली नसून केवळ अधिकाऱ्यांना तयारी करण्यासाठी संदर्भ म्हणून दिली असल्याचा आणि याच दिवशी मतदान होईल असे नाही, असा खुलासा दिल्ली निवडणूक आयोगाने ‘एक्स’ या सोशल मीडियावर केला आहे.

दिल्ली निवडणूक आयोगाने १९ जानेवारीला दिल्लीतील जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकाऱ्यांना लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या संदर्भात पत्र पाठविले. यात निवडणूक आयोगाने दिलेल्या वर्षाच्या वेळापत्रकाप्रमाणे निवडणुकीची पूर्वतयारी कुठपर्यंत आली आहे, याची माहिती देण्याचे निर्देश यात आहे.

यात संदर्भासाठी लोकसभेसाठीच्या मतदानाची संभाव्य तारीख १६ एप्रिल असल्याचा उल्लेख केला आहे. निवडणुकीची अधिसूचना जारी करण्याची तारीख व मतमोजणीच्या संभाव्यतारखे दरम्यान दिल्ली प्रशासनाला काय काय तयारी करावी लागेल, याचा आढावा घेण्यासाठी हे पत्र पाठविले आहे. ‘हा दिवस मतदानाचा नाही. ही तारीख केवळ पूर्वतयारी करण्यासाठी एक संदर्भ म्हणून घेतली आहे. ही मतदानाची तारीख नव्हे,’ असेही या खुलाशात म्हटले आहे.

पत्र व्हायरल झाल्यानंतर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण

पत्र व्हायरल झाल्यानंतर निवडणूक आयोगाने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. या पत्रावर, निवडणूक आयोगाने तात्पुरता मतदानाचा दिवस 16 एप्रिल 2024 घोषित केला असून त्याविषयीच्या अधिसूचना दिल्लीच्या सर्व 11 जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना जारी करण्यात आली होती. त्यावर ‘भारतीय निवडणूक आयोगाच्या निवडणूक आराखड्यात दिलेल्या वेळेचे पालन’ असं शीर्षकही देण्यात आलं होतं, असं स्पष्टीकरण देताना निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.

तर तारीख निवडणुकीची तारीख नसून निवडणूक आराखड्याचे नियोजन करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या संदर्भासाठी ही तारीख दिल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare Reaction On Sharad Pawar : शरद पवार यांच्या वक्तव्यावर सुनिल तटकरे काय म्हणाले, पक्ष एकत्रीकरणावरही प्रतिक्रिया...

Gold Rate Today : सोनं 19 हजार तर चांदी 98 हजारांनी स्वस्त! पाहा तुमच्या शहरातील आजचा भाव

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग! मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून रामकुंडाची पाहणी

Nylon Manja : नायलॉन मांजामुळे नागपूर शहरात ३६ जण जखमी

Pakistan Cricket : पाकिस्तानचा गोंधळ! T20 World Cup बद्दल केलेला मेसेज डिलिट... आता यांचा काय नवीन ड्रामा? चाहते संतापले

SCROLL FOR NEXT