Kanhaiya Kumar
Kanhaiya Kumar 
देश

Lok Sabha Elections 2024: काँग्रेसची मोठी खेळी! भाजपच्या प्रसिद्ध नेत्याला पाडण्यासाठी कन्हैया कुमार मैदानात

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये १० उमेदवारांची नावे असून कन्हैया कुमार यांचेही या यादीमध्ये नाव आहे. त्यांना उत्तर पूर्व दिल्लीतून उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यांची लढत भाजपच्या मनोज तिवारी यांच्याविरोधात होणार आहे. (Lok Sabha Elections 2024 Congress releases another list of 10 candidates Kanhaiya Kumar North East Delhi Manoj)

लोकसभा निवडणुकाचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. देशामध्ये सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. भाजप आणि काँग्रेसकडून त्यानुसार उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. काँग्रेसने नुकतेच १० उमेदवारांची यादी जाहीर केलीये. यात तीन दिल्ली, सहा पंजाब आणि एक उत्तर प्रदेशातील उमेदवारांची नावे आहेत. एएनआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

दिल्लीच्या चांदणी चौक मतदारसंघातून जेपी अग्रवाल, उत्तर पूर्व दिल्लीतून कन्हैया कुमार, उत्तर पश्चिम दिल्लीतून उदित राज यांना तिकीट देण्यात आलं आहे. पंजाबमध्ये अमृतसरमधून गुरजीत सिंग औजला, जालंधरमधून माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, फतेहगड साहिबमधून अमर सिंह, भटिंडा मधून जीत मोहिंदर सिंग सिद्धू, संगरुरमधून सुखपाल सिंह खैरा आणि पटियालामधून डॉ. धर्मवीर गांधी यांना तिकीट देण्यात आलं आहे. याशिवाय उत्तर प्रदेशातील इलाहाबाद जागेवरुन उज्ज्वल रेवती रमन सिंह यांना संधी देण्यात आली आहे.

कन्हैया कुमार हे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. यावेळी त्यांना मनोज तिवारी यांच्या विरोधात उभे करण्यात आले आहे. मनोज तिवारी हे प्रसिद्ध अभिनेते आहेत. शिवाय, भाजपने त्यांच्यावर विश्वास दाखवून दुसऱ्यांदा तिकीट दिलं आहे. त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये दिल्लीची जनता कोणाच्या पारड्यात यश टाकते हे पाहावं लागणार आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Exit Poll: सांगलीची पाटीलकी विशाल पाटलांकडे? भाजपला बसणार अँटी इनकबन्सीचा फटका

Mumbai Rain Update : मुंबईत पाऊस कधी येणार? जाणून घ्या हवामान अभ्यासकांचा अंदाज

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Lok Sabha Election Result 2024 : ‘इंडिया’ चेच सरकार येणार 'तेजस्वी यादव' यांचा विश्‍वास: एनडीए हद्दपार होणार

Lok Sabha 7th Phase Voting : देशात सातव्या टप्प्यात ५९ टक्के मतदान! पश्चिम बंगालात सर्वाधिक तर यूपीत सर्वात कमी मतदान

SCROLL FOR NEXT