pm narendra modi  sakal
देश

Narendra Modi : लोकसभा निवडणूकीत मोदींना हा नेता देऊ शकतो टक्कर! ताज्या सर्व्हेत नाव आलं पुढं

रोहित कणसे

लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये विरोधी पक्षांचा चेहरा कोण असेल? यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यादरम्यान विरोधकांकडून भाजप विरोधात एकजूटीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत यादरम्यान नेमकं आगमी २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान पदासाठी कोणाचे नाव पुढे येईल याबद्दल अद्याप स्पष्टता नाहीये. पंतप्रधान पदासाठी मोदींच्या विरोधात अनेक दावेदार समोर येत आहेत. यादरम्यान दिल्ली आणि पंजाब येथे सत्तेत असलेल्या आपचे नेते अरविंद केजरीवाल देखील पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असल्याचे सांगितले जात आहे.

आपचे नेते अरविंद केजरीवाल हेच २०२४ मध्ये नरेंद्र मोदींच्या विरोधात भक्कम पर्याय असू शकतात असा दावा करताना दिसत आहेत. यादरम्यान एक सर्व्हे समोर आला आहे ज्यामध्ये पुन्हा एकदा पीएम मोदी सर्वात लोकप्रिय नेते असल्याचं सांगितलं जात आहे. या रेसमध्ये राहुल गांधी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर पंतप्रधान म्हणून अरविंद केजरीवाल, नितीश कुमार आणि ममता बॅनर्जी या नेत्यांना खूप कमी पसंती मिळाली आहे.

लोकनिती यांच्या मदतीने एनडीटीव्हीने जनतेचं मत जाणून घेण्यासाठी हा सर्व्हे केला होता. १० मे ते १९ मे या कालावधीत १९ राज्यात करण्यात आलेल्या या सर्व्हेत सर्वाधिक ४३ टक्के मतं पीएम मोदींना मिळाली. राहुल गांधी यांना २७ टक्के लोकांनी मतं दिली.तर ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांना संयुक्तपणे तीसऱ्या क्रमांकावर राहीले. मात्र या दोघांना फक्त चार टक्के लोकांनी पहिली पसंती दिली आहे. तर अखिलेश यादव आणि ३ टक्के लोकांनी तर नितीश कुमार यांनी फक्त १ टक्के लोकांनी मतं दिली आहेत.

मोदींना आव्हान कोण देऊ शकेल?

या सर्व्हेमध्ये नरेंद्र मोदी यांना कोणता नेता आव्हान देऊ शकतो असा प्रश्न विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना ३४ टक्के लोकांनी राहुल गांधी यांना पसंती दिली आहे. तर या यादीत दुसरं नाव अरविंद केजरीवाल यांचं आहे. ११ टक्के लोकांना केजरीवाल हे नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सर्वात मोठे चॅलेंजर वाटतात. तर ९ टक्के लोकांनी मोदींना कोणीही आव्हान देऊ शकत नाही असे वाटते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT